• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 31, 2026
in आरोग्य, जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील

सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील

र्गोदावरी लक्ष्मी बॅकेला १ कोटीं ६३ लक्ष निव्वळ नफा

जळगाव- गोदावरी लक्ष्मी को-ऑप बँक ही सभासदांच्या विश्वासाच्या बळावरच उन्नती अन् प्रगती करीत असून यंदा बँकेला १ कोटी ६३ लाखांचा नफा झाल्याचे बँकेचे चेअरमन डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले.गोदावरी लक्ष्मी को-ऑप बँकेची २६ वी वार्षिक सभा चेअरमन डॉ. उल्हास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर बँकेचे व्हा. चेअरमन सोनू भंगाळे, शालीग्राम चौधरी, तज्ज्ञ संचालक हेमचंद्र वायकोळे, संचालक सुभाष पाटील, तज्ज्ञ संचालक सीए सुनील महाले, चंद्रकुमार चौधरी, सुरेश झोपे, डॉ. संपत वानखेडे, डॉ. चंद्रसिंग पवार, हरिष फालक, लिलाधर चौधरी, राजेंद्र कुरकुरे, राजेंद्र महाजन, आशाताई तळेले, संगीताताई चौधरी, यमुनाबाई महाजन, डॉ. सौरभ पाटील,स्मिता चौधरी, प्रमोद पटेल व्यवस्थापकीय संचालक अशोक महाजन, आदी मान्यवर उपस्थित होते. सभेच्या सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी चेअरमन डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले की, गोदावरी लक्ष्मी बँकेच्या ठेवींमध्ये वाढ झाली असून १०८ कोटी ३१ लक्ष रूपयांपर्यंत ठेवी झाल्या आहेत. वसूल भागभांडवल ६ कोटी १ लक्ष असून एनपीए केवळ ०.९० टक्के आहे. बँकेला लेखापरिक्षणात अ दर्जा प्राप्त झाला असून यंदा १ कोटी ६३ लाखांचा निव्वळ नफा झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक अशोक महाजन यांनी प्रास्ताविकातून बँकेच्या कार्याची माहिती दिली. सभेमध्ये १० विषयांना सर्वानुमते मंजूरी देण्यात आली. तसेच उपस्थित सभासदांना आर्थिक व्यवहारांशी संबंधित प्रशिक्षणपर मार्गदर्शन करण्यात आले. आभार संचालिका आशाताई तळेले यांनी मानले.

Next Post
रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद

ताज्या बातम्या

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद
गुन्हे

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद

August 31, 2026
सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील
आरोग्य

सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील

August 31, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

अमळनेर तालुक्यात भेसळयुक्त दूध तयार करणाऱ्यावर कारवाई

August 31, 2026
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन
जळगाव जिल्हा

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन

August 31, 2026
महाराष्ट्रात भाजपची पायाभरणी करणाऱ्या नेत्यांमध्ये महाजन, खडसेंचे योगदान मोलाचे : शरद पवार
खान्देश

महाराष्ट्रात भाजपची पायाभरणी करणाऱ्या नेत्यांमध्ये महाजन, खडसेंचे योगदान मोलाचे : शरद पवार

August 30, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमेन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमेन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

August 30, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add