• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद

२०८ ग्रॅम सोने व २८ ग्रॅम चांदी हस्तगत

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 31, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद

२०८ ग्रॅम सोने व २८ ग्रॅम चांदी हस्तगत
जळगाव : कुटुंबीय उज्जैन येथे दर्शनासाठी गेले असल्याची संधी साधून रामेश्वर कॉलनीतील बंद घराचे कुलूप तोडून लाखो रुपयांचे दागिने लंपास करणाऱ्या दोन आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत जेरबंद केले. आरोपींकडून ३१ लाख २६ हजार ८०० रुपये किमतीचे २०८ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि २८ ग्रॅम चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.या कारवाईमुळे घरफोडीच्या गंभीर गुन्ह्याचा जलदगतीने तपास करून चोरीचा मुद्देमाल मोठ्या प्रमाणात परत मिळवण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे.

कुटुंब उज्जैनला अन् चोरट्यांनी साधली संधी
रामेश्वर कॉलनीतील रहिवासी संगीता घुगे या कुटुंबासह उज्जैन, मध्य प्रदेश येथे दर्शनासाठी गेल्या होत्या. घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी २७ ऑगस्ट रोजी रात्री ३.३० ते २८ ऑगस्ट रोजी रात्री ३.३० या कालावधीत घराच्या दरवाज्याची कडी-कॉयंडा तोडून आत प्रवेश केला.घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेण्यात आली. घुगे कुटुंबीय परतल्यानंतर घरफोडी झाल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६९७/२०२६ दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(ए), ३३१(३) आणि ३३१(४) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.

सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाने मिळाला धागा
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना आरोपींचा शोध घेऊन चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्याच्या सूचना दिल्या.त्यानुसार पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
पथकाने घटनास्थळाची बारकाईने पाहणी करत महत्त्वाचे पुरावे संकलित केले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहिती यांच्या आधारे संशयितांचा शोध सुरू करण्यात आला.तपासाची चक्रे वेगाने फिरल्यानंतर पोलिसांनी विशाल मुरलीधर दाभाडे (वय २५, व्यवसाय मजुरी) आणि जितेंद्र मुरलीधर दाभाडे (वय २७), दोघेही रा. सप्तश्रृंगी माता मंदिराजवळ, रामेश्वर कॉलनी, जळगाव, यांना ताब्यात घेतले.

चौकशीत माहिती उघड; लाखोंचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी दोन्ही संशयितांकडे कसून चौकशी केली असता घरफोडीच्या गुन्ह्याबाबत महत्त्वाची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले.यामध्ये सोन्याचे गंठन, मिनी पाटली, फॅन्सी शॉर्ट पाटली, काळेमणी पाटली, टॉप्स, विविध डिझाइनच्या अंगठ्या, नथ तसेच चांदीचे जोडवे यांचा समावेश आहे.पोलिसांनी एकूण ३१ लाख २६ हजार ८०० रुपये किमतीचे २०८ ग्रॅम सोने आणि २८ ग्रॅम चांदी हस्तगत केली आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि जळगाव उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक विजयसिंग पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील, रमेश चौधरी, किरण चौधरी, पोलीस नाईक प्रदीप चौधरी, तसेच पोलीस कॉन्स्टेबल रमाकांत साळुंखे, नितीन ठाकूर, राहुल घेटे, गणेश टेकर, किरण पाटील, शशिकांत मराठ, ललित नारखेडे, विशाल कोळी, योगी घुगे आणि सुभाष साबळे यांनी कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली.


 

Next Post
विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

ताज्या बातम्या

जळगावमध्ये ‘श्री दुर्गामाता महादौड’ उत्साहात संपन्न; राष्ट्रभक्तीच्या महापुरात उजळला इतिहास
जळगाव जिल्हा

जळगावमध्ये ‘श्री दुर्गामाता महादौड’ उत्साहात संपन्न; राष्ट्रभक्तीच्या महापुरात उजळला इतिहास

October 20, 2026
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ‘गरबा नी गूंज’द्वारे भक्तीचा जागर
जळगाव जिल्हा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये ‘गरबा नी गूंज’द्वारे भक्तीचा जागर

October 20, 2026
नेहरू चौक मित्र मंडळातर्फे विजयादशमीनिमित्त पारंपारिक शस्त्र व ध्वजपूजन सोहळा संपन्न
जळगाव जिल्हा

नेहरू चौक मित्र मंडळातर्फे विजयादशमीनिमित्त पारंपारिक शस्त्र व ध्वजपूजन सोहळा संपन्न

October 20, 2026
पाणी वाया घालवणाऱ्यांसह अनाधिकृत अतिक्रमणांवर कडक कारवाईचे आदेश
जळगाव जिल्हा

पाणी वाया घालवणाऱ्यांसह अनाधिकृत अतिक्रमणांवर कडक कारवाईचे आदेश

October 19, 2026
आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन
आरोग्य

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे राष्ट्रीय रील्स स्पर्धेचे आयोजन

October 19, 2026
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात ‘अ‍ॅनाटॉमी डे’ उत्साहात साजरा
खान्देश

डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात ‘अ‍ॅनाटॉमी डे’ उत्साहात साजरा

October 19, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add