मुक्ताईनगर | प्रतिनिधी : शिवीगाळ केल्याच्या कारणावरून तरुणाला चौघांनी संगनमत करून मारहाण केल्याची घटना मुक्ताईनगर शहरातील चारठाणा परिसरात घडली. याप्रकरणी मुक्ताईनगर नगर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या नोंदीनुसार, २१ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री साडेसातच्या सुमारास फिर्यादीच्या घरासमोर रस्त्यावर ही घटना घडली. शिवीगाळ केल्याच्या कारणावरून वाद झाल्यानंतर दिपक अर्जुन तायडे यांनी फिर्यादीच्या डोक्यावर डाव्या बाजूस विटेने मारून दुखापत केली.

त्यानंतर अर्जुन किसन तायडे, ज्ञानेश्वर लक्ष्मण तायडे आणि दुर्गाबाई अर्जुन तायडे यांनी फिर्यादीचे केस पकडून हाताचापटांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच शिवीगाळ केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

या प्रकरणी मुक्ताईनगर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक साहेबराव जाधव करीत आहेत.









