• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

‘मनपा शाळा, शहराचा अभिमान’; उपमहापौर मनोज चौधरींकडून शाळांच्या सद्यस्थितीचा आढावा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 12, 2026
in जळगाव जिल्हा
0
‘मनपा शाळा, शहराचा अभिमान’; उपमहापौर मनोज चौधरींकडून शाळांच्या सद्यस्थितीचा आढावा

जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव शहर महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शनिवारी उपमहापौर मनोज चौधरी यांनी आपल्या दालनात सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांची महत्त्वाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत शाळांची सद्यस्थिती, पटसंख्या वाढवणे आणि शैक्षणिक दर्जा सुधारण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या कशी वाढवता येईल, यावर उपमहापौरांनी विशेष मार्गदर्शन केले. पालकांचा विश्वास संपादन करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना महापालिका शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी दिले. विद्यार्थ्यांना खाजगी शाळांच्या तोडीचे आणि दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना देण्यात आल्या.

केवळ अभ्यासातच नव्हे, तर क्रीडा क्षेत्रातही जळगाव शहराचे नाव उज्ज्वल व्हावे, यासाठी खेळाडूंना प्रोत्साहन आणि सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा झाली. शाळांच्या इमारतींची दुरुस्ती, स्वच्छता आणि अद्ययावत शैक्षणिक साधनांचा वापर करून शाळांचा चेहरामोहरा बदलण्याचा मानस उपमहापौर मनोज चौधरी यांनी व्यक्त केला.

“आपल्या महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी उद्याचे भविष्य आहेत. या विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण आणि खेळाच्या संधी मिळाल्यास ते शहराचे नाव नक्कीच उंचावतील. शाळांची पटसंख्या वाढवणे आणि शैक्षणिक दर्जा सुधारणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे उपमहापौर चौधरी यांनी सांगितले. या बैठकीला जळगाव महानगरपालिकेच्या विविध शाळांचे मुख्याध्यापक आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या शेवटी, शाळांच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन उपमहापौरांनी दिले

Tags: #jalgaon_city#municipalcorporation
Next Post
‘समन्वय २०२६’ चा दिमाखात शुभारंभ; ‘इन्फाईनाइट हॉरीझन’ थीमवर विद्यार्थ्यांनी साकारल्या कलाकृती

'समन्वय २०२६' चा दिमाखात शुभारंभ; 'इन्फाईनाइट हॉरीझन' थीमवर विद्यार्थ्यांनी साकारल्या कलाकृती

ताज्या बातम्या

ख्यातनाम हृदय शल्यचिकित्सक डॉ. यतीन वाघ यांची डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नियुक्ती
आरोग्य

ख्यातनाम हृदय शल्यचिकित्सक डॉ. यतीन वाघ यांची डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नियुक्ती

July 14, 2026
रावेर येथील खून प्रकरणातील दोन फरार आरोपींना २४ तासांच्या आत अटक
गुन्हे

रावेर येथील खून प्रकरणातील दोन फरार आरोपींना २४ तासांच्या आत अटक

July 14, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात
क्रिडा

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात

July 14, 2026
शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; जळगावात दोन बालविवाह रोखले, कायदा मोडल्यास थेट जेलचा इशारा
गुन्हे

शनिपेठ पोलिसांची धडक कारवाई; जळगावात दोन बालविवाह रोखले, कायदा मोडल्यास थेट जेलचा इशारा

July 13, 2026
स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. संदीपकुमार पाटील तर सचिवपदी डॉ. शलाका पाटील
आरोग्य

स्त्रीरोग तज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. संदीपकुमार पाटील तर सचिवपदी डॉ. शलाका पाटील

July 13, 2026
४४ वर्षांचा समृद्ध जीवनप्रवास आणि जळगावच्या विकासाचा ध्यास
जळगाव जिल्हा

४४ वर्षांचा समृद्ध जीवनप्रवास आणि जळगावच्या विकासाचा ध्यास

July 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add