• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

‘समन्वय २०२६’ चा दिमाखात शुभारंभ; ‘इन्फाईनाइट हॉरीझन’ थीमवर विद्यार्थ्यांनी साकारल्या कलाकृती

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 13, 2026
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
‘समन्वय २०२६’ चा दिमाखात शुभारंभ; ‘इन्फाईनाइट हॉरीझन’ थीमवर विद्यार्थ्यांनी साकारल्या कलाकृती

​जळगाव, (प्रतिनिधी) : येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘आग्नेय’ बॅचतर्फे आयोजित ‘समन्वय २०२६’ या वार्षिक सांस्कृतिक सप्ताहाचा प्रारंभ उत्साहात झाला. सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी आर्ट गॅलरीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्यातील सुप्त कलागुणांचे दर्शन घडवत विविध मनमोहक कलाविष्कार साकारले.

​मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन या महोत्सवाचे उद्घाटन माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, डॉ. सुहास बोरले, डॉ. अनिकेत पाटील, वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, रजिस्ट्रार प्रमोद भिरूड आणि डॉ. विजय बाविस्कर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी धन्वंतरी पूजन आणि स्व. गोदावरी आजी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​’इन्फाईनाइट हॉरीझन’ थीमवर आधारित कलाकृती यंदाची आर्ट गॅलरी ‘इन्फाईनाइट हॉरीझन’ या संकल्पनेवर आधारित होती. यामध्ये विद्यार्थ्यांनी भविष्यातील जग, अश्मयुगीन काळ, ब्रह्मांड, पाण्याखालील विश्व, हम्पी संस्कृती, शालीमार बाग, मीनाक्षी मंदिर आणि ऐतिहासिक रायगड किल्ला अशा १० वैविध्यपूर्ण कलाकृती अत्यंत कल्पकतेने उभ्या केल्या होत्या. हार्दिक जैस्वाल या विद्यार्थ्याने स्व. गोदावरी आजींचे साकारलेले तैलचित्र (पोट्रेट) डॉ. उल्हास पाटील यांना भेट दिले, जे सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले.

​यावेळी न्यूरोसर्जरी तज्ज्ञ डॉ. अनिकेत पाटील यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. डॉ. पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे विशेष कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात ‘समन्वय २०२६’ चे विशेष ट्रेलरही दाखवण्यात आले. अमित पाटील व आस्था भागवत यांनी सूत्रसंचालन केले.

​कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वेदांत दाते, उन्नती खरोडे, हार्दिक जैस्वाल, शुभदा तोडकर, ऋत्विक भुजबळ आणि मुस्कान सिद्दीकी यांनी विशेष परिश्रम घेतले. १२ एप्रिल रोजी आर्ट गॅलरीने सुरू झालेल्या या सप्ताहात १३ एप्रिलला ‘प्रॉम्प नाईट’ पार पडली, तर १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १८ एप्रिलपर्यंत हा महोत्सव विविध उपक्रमांनी रंगणार आहे.

Tags: #Godavarifaundetion
Next Post
आशाताईंच्या सुरांनी जपली निसर्गाची कोमलता आणि मातीशी नाळ!

आशाताईंच्या सुरांनी जपली निसर्गाची कोमलता आणि मातीशी नाळ!

ताज्या बातम्या

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!
गुन्हे

मुक्ताईनगरमधून चोरीला गेलेले  वाहन अमरावतीत सापडले!

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
गुन्हे

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन
जळगाव जिल्हा

विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन

October 12, 2026
अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!
गुन्हे

अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!

October 12, 2026
जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
जळगाव जिल्हा

जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

October 12, 2026
टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
खान्देश

टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add