• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गांधीतीर्थच्या ‘पीस वॉक’ने नवीन वर्षाची सकारात्मक पहाट

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 1, 2022
in जळगाव जिल्हा
0
गांधीतीर्थच्या ‘पीस वॉक’ने  नवीन वर्षाची सकारात्मक पहाट

जळगाव, दि. 01 –  गांधी रिसर्च फाऊंडेशनने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जैन हिल्स परिसरात पीस वॉकचे आयोजन केले होते, त्यात शहरातील निवडक नागरीकांनी सहभाग नोंदविला.  “आयुष्यात प्रथमच नवीन वर्षाची सुरुवात अतिशय प्रसन्न व सकारात्मकता घेऊन आली” असे मत ‘पीस वॉक‘मध्ये सहभागी झालेल्यांनी व्यक्त केले. जैन हिल्सच्या निसर्गरम्य वातावरणात पंचमहाभूत तत्वे आणि मानवी जीवन यांचा अन्योन्य संबंध उलगडत या पीस वॉकचे आयोजन करण्यात आले होते.
सुरुवातीस सर्व सहभागींचा परिचय करून घेण्यात आला. चार किलोमीटरच्या या वॉकमध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश हि पंचतत्वे आणि मानवी जीवन यांचा संबंध वैज्ञानिक व आध्यात्मिकदृष्ट्या समजावून सांगण्यात आला. पक्ष्यांचा मधुर आवाज, थंड व शांत हवा, भक्ती संगीत आणि चालणाऱ्यांचा उत्साह वाढविणारे जैन हिल्सचे सकाळचे आल्हाददायी वातावरण यामुळे शांतीचा अनुभव सहभागींनी घेतला.
गांधी रिसर्च फाऊंडेशनचे डॉ.अश्विन झाला यांनी कबीराचे दोहे, संत वचने यांची उदाहरणे देत मानवी शरीराचा पंचतत्वांशी असलेला संबंधांचे खास निरुपण या वॉकच्या दरम्यान ठराविक अंतराने केले. सहभागींनी आपल्या प्रतिक्रियेत अशा प्रकारच्या पीस वॉकची आवश्यकता प्रतिपादित केली. जीवनातील शांतीचा सुखद अनुभव घेता आला याबद्दल आयोजकांचे धन्यवाद व्यक्त केले. आगामी काळात जीवनाशी संबंधित वेगवेगळ्या विषयांना घेऊन पीस वॉकचे आयोजन करावे अशी सूचनाही केली.
उद्योजक स्वरूप लुंकड, जळगाव जनता बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुंडलिक पाटील, शरद पाटील, नीलम जोशी, सुनील पवार, जयश्री जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. गिरीश कुळकर्णी यांनी स्वागत व आभार मानले. बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिक सपन झुनझुनवाला, शासकीय तंत्र निकेतनमधील प्राध्यापक वृंद आदी उपस्थिती होते.

Next Post
पारोळा-कजगाव रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी मनसेचे निवेदन

पारोळा-कजगाव रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी मनसेचे निवेदन

ताज्या बातम्या

जळगावच्या पिंप्राळ्यात गोळीबार; संशयित फरार, पोलिसांकडून शोध सुरू
खान्देश

जळगावच्या पिंप्राळ्यात गोळीबार; संशयित फरार, पोलिसांकडून शोध सुरू

January 15, 2026
कर्तव्य प्रथम! अशोक जैन यांनी सहकुटुंब केले मतदान; नागरिकांनाही केले आवाहन
जळगाव जिल्हा

कर्तव्य प्रथम! अशोक जैन यांनी सहकुटुंब केले मतदान; नागरिकांनाही केले आवाहन

January 15, 2026
जळगाव महिला मंडळातर्फे शनिवारी हळदी-कुंकू सोहळा; ‘पैठणी’ जिंकण्याची सुवर्णसंधी
खान्देश

जळगाव महिला मंडळातर्फे शनिवारी हळदी-कुंकू सोहळा; ‘पैठणी’ जिंकण्याची सुवर्णसंधी

January 14, 2026
जळगाव मनपा निवडणुक: गुरुवारी ५१६ केंद्रांवर मतदान, शुक्रवारी दुपारी लागणार निकाल!
खान्देश

जळगाव मनपा निवडणुक: गुरुवारी ५१६ केंद्रांवर मतदान, शुक्रवारी दुपारी लागणार निकाल!

January 13, 2026
जळगाव: प्रभाग १३ मध्ये महायुतीचे ‘शक्तिप्रदर्शन’; भव्य दुचाकी रॅलीने वेधले नागरिकांचे लक्ष
खान्देश

जळगाव: प्रभाग १३ मध्ये महायुतीचे ‘शक्तिप्रदर्शन’; भव्य दुचाकी रॅलीने वेधले नागरिकांचे लक्ष

January 13, 2026
भाजपचा शिस्तीचा बडगा! जळगाव मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत ३ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी
खान्देश

भाजपचा शिस्तीचा बडगा! जळगाव मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत ३ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी

January 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group