• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गांधी तीर्थात ‘पीस बिल्डर्स फोरम’चा जागर; देश-विदेशातील शांतीदूतांचा जळगावात मेळावा

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 9, 2026
in जळगाव जिल्हा, सामाजिक
0
गांधी तीर्थात ‘पीस बिल्डर्स फोरम’चा जागर; देश-विदेशातील शांतीदूतांचा जळगावात मेळावा

जळगाव, (प्रतिनिधी) : गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पीस बिल्डर्स फोरम या राष्ट्रीय कार्यक्रमाचे उद्घाटन कस्तूरबा गांधी व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन करण्यात आले. गांधी तीर्थ येथील कस्तुरबा सभागृह येथे झालेल्या उद्घाटन समारंभाप्रसंगी कांताई नेत्रालयाच्या संचालिका डॉ. भावना जैन, गांधी रिसर्च फाऊंंडेशनच्या डॉ. गीता धरमपाल, एकता परिषदेचे अध्यक्ष राजगोपाल, जिल कारहॅरीस, सावत्रीबेन, इंद्राजी उपस्थित होते.

या कार्यक्रमात दि. ९ ते ११ मार्च दरम्यान शांतीच्या विविध आयामांना स्पर्श केला जाणार आहे. त्यासाठी माहितीपट (डॉक्युमेंट्री) प्रदर्शन, संवाद व चर्चासत्रे आयोजित केली आहेत. यामध्ये कॅनडासह, आंध्रप्रदेश, केरळ, बिहार, तामिळनाडू, ओडिसा, मणिपूर, नागालॅंड, महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली, झारखंड, तेलंगणा, गुजरात राज्यांसह देशभरातील मान्यवर पीस वर्कर सहभागी झाले आहेत.

शांती, न्याय व परिवर्तन हा गुण महिला शक्तीचा असल्याने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेष नृत्य प्रस्तुती करण्यात आली. डॉ. अपर्णा भट-कासार संचलित प्रभाकर कला संगित अकॅडमीच्या विद्यार्थिनींनी अप्रतिम कथक नृत्य सादर केले.

गीता धरमपाल यांनी महिला दिना निमित्त विशेष संदेश देत गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या कार्याविषयी सांगितले. जिल कारहॅरीस यांनी समन्वय करताना सांगितले की, शोध, संवाद, प्रशिक्षण, युवाप्रशिक्षणातून समाजात शांती न्याय व परिवर्तन घडविण्यासाठी एकता परिषद व गांधी रिसर्च फाऊंडेशन चे कार्य महत्त्वाचे आहे, महात्मा गांधी विचारांच्या प्रचार प्रसारातून समाजात परिवर्तन घडेल असेही त्या म्हणाल्यात. यावेळी एकता परिषद व गांधी रिसर्च फाऊंडेशन यांच्यावतीने २०१६ मध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय महिला परिषदेची  विशेष डाक्युमेंट्री (माहितीपट) दाखविण्यात आली. दीपक मिश्रा यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले.

Tags: #GandhiresearchfoundationJalgaon

ताज्या बातम्या

गांधी तीर्थात ‘पीस बिल्डर्स फोरम’चा जागर; देश-विदेशातील शांतीदूतांचा जळगावात मेळावा
जळगाव जिल्हा

गांधी तीर्थात ‘पीस बिल्डर्स फोरम’चा जागर; देश-विदेशातील शांतीदूतांचा जळगावात मेळावा

March 9, 2026
महापालिकेत ‘सत्ता’ आपली, पण ‘शिस्त’ कोणाची? भाजपमधील अंतर्गत खदखद चव्हाट्यावर!
जळगाव जिल्हा

महापालिकेत ‘सत्ता’ आपली, पण ‘शिस्त’ कोणाची? भाजपमधील अंतर्गत खदखद चव्हाट्यावर!

March 6, 2026
अवैध वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या ३४ वाहनांचा १२ मार्च रोजी लिलाव
जळगाव जिल्हा

अवैध वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या ३४ वाहनांचा १२ मार्च रोजी लिलाव

March 5, 2026
पोलिसांची मोठी कारवाई; ६३ किलो गांजासह दोन कार जप्त, सहा आरोपींना बेड्या
गुन्हे

पोलिसांची मोठी कारवाई; ६३ किलो गांजासह दोन कार जप्त, सहा आरोपींना बेड्या

March 4, 2026
जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम
जळगाव जिल्हा

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

March 2, 2026
प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group