जळगाव, दि. 31 – मानवी जीवनात सुदृढ आरोग्य व मनःशांतीला विशेष महत्व आहे. कोरोनाच्या कालखंडाने हि गोष्ट अधोरेखित केली आहे. गांधी रिसर्च फाऊंडेशनने याच उद्देशाने नवीन वर्षाची सुरुवात 1जानेवारी 2022 ‘पीस वॉक’ने करावी यासाठीचे नियोजन केले आहे.
जळगावात जैन हिल्सच्या शांत, प्रसन्न आणि निसर्गरम्य वातावरणात हा पीस वॉक होईल. मानवी जीवन आणि पंचमहाभूते यात अद्वैताचे नाते आहे. मानवी शरीर या पंचमहाभूतांनी बनलेले आहे. एक तासाच्या या पीस वाॅकमध्ये आपण हा संबंध समजून घेणार आहोत. त्यामुळे नवीन वर्षात जीवनाकडे पाहावयाचा दृष्टिकोन आपणास लाभेल. डाॅ. अश्विन झाला पीस वाॅकचे निरुपण करणार आहेत. अधिक माहितीसाठी गिरीश कुळकर्णी यांचेशी ९८२३३३४०८४ या क्रमांकावर संपर्क करावा.