• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कमल राजाराम वाणी विद्यालयात ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ उत्साहात साजरा

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 28, 2026
in जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

जळगाव, (प्रतिनिधी) : प्रगती शिक्षण मंडळ संचलित कमल राजाराम वाणी बालनिकेतन विद्यामंदिर व ललिता युवराज वाणी माध्यमिक विद्यालयात ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी जळगाव शहराच्या महापौर दीपमाला काळे यांनी विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते थोर शास्त्रज्ञ डॉ. सी.व्ही.रमन व डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमा पूजनाने आणि दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ. युवराज वाणी, सचिव गोवर्धन पाटील, शिक्षणतज्ज्ञ प्रा. ललिता वाणी, संचालक वंदन वाणी, माजी मुख्याध्यापिका शालिनी भंगाळे तसेच मुख्याध्यापक डॉ. रवींद्र माळी, नीलेश नाईक व ज्योती बिऱ्हाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

विद्यार्थ्यांची कल्पकता आणि सादरीकरण पाहून महापौर दीपमाला काळे यांनी त्यांचे कौतुक केले व भविष्यात शास्त्रज्ञ बनण्यासाठी जरूर प्रयत्न करावे असे त्यांना सांगितले. इयत्ता ५ वी ते ९ वीच्या विद्यार्थ्यांनी ‘स्वयंपाक घरातील विज्ञान’ ही नाटिका सादर करून विज्ञानाचे महत्त्व पटवून दिले. इयत्ता ५ वी ते ७ वीच्या विद्यार्थ्यांनी ‘जो है जैसा है वैसा क्यू है’ हे गीत सादर केले. इयत्ता १ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांनी ‘टाकाऊ पासून टिकाऊ’ वस्तू तयार केल्या होत्या, ज्याचे उद्घाटन महापौरांच्या हस्ते करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रिक लिफ्ट, कुलर, ऑटोमॅटिक सॅनिटायझर मशीन, न्यूटनचे नियम आणि आम्ल-आम्लारी ओळख अशा विविध प्रयोगांचे थेट सादरीकरण केले. तसेच वैज्ञानिक रांगोळी स्पर्धेतूनही आपली कला जोपासली.

आपल्या भाषणात महापौर दीपमाला काळे म्हणाल्या की, “आजचे युग हे विज्ञानाचे आहे. विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षेत गुण मिळवण्यासाठी न धावता कल्पक निर्मितीसाठी देखील प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येक घटनेमागील ‘कार्यकारणभाव’ शोधला पाहिजे. अंधश्रद्धेला थारा न देता विज्ञानाची कास धरली तरच आपला आणि देशाचा विकास होईल.”

विद्यार्थ्यांच्या कल्पक प्रयोगांचे त्यांनी विशेष कौतुक केले. नियोजन व आभार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंदना नेहेते व सुवर्णा पोतदार यांनी केले, तर संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन  उज्ज्वला जाधव यांनी केले. शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

ताज्या बातम्या

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या
जळगाव जिल्हा

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 26, 2026
रावेर पोलिसांची मोठी कारवाई; बुऱ्हाणपूरच्या व्यापाऱ्याला लुटणारे ७ संशयित जेरबंद!
गुन्हे

रावेर पोलिसांची मोठी कारवाई; बुऱ्हाणपूरच्या व्यापाऱ्याला लुटणारे ७ संशयित जेरबंद!

February 25, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group