• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

प्लास्टिक विरोधात जळगाव महापालिकेचा ‘एल्गार’; १ मार्चनंतर थेट २५ हजारांचा दंड अन् फौजदारी गुन्हे!

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 18, 2026
in जळगाव जिल्हा
0
प्लास्टिक विरोधात जळगाव महापालिकेचा ‘एल्गार’; १ मार्चनंतर थेट २५ हजारांचा दंड अन् फौजदारी गुन्हे!

​जळगाव, (प्रतिनिधी) : शहराला प्लास्टिकच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी जळगाव महानगरपालिकेने आता निर्णायक पाऊल उचलले आहे. महापौर दीपमाला काळे यांनी शहरातील प्लास्टिक विक्रेत्यांना १ मार्चपर्यंत प्लास्टिक विक्री पूर्णपणे थांबविण्याचा ‘अल्टिमेटम’ दिला असून, त्यानंतरही प्लास्टिक आढळल्यास २५ हजार रुपयांचा दंड आणि थेट गुन्हे दाखल करण्याचा कडक इशारा दिला आहे. ​सोमवारी, १६ फेब्रुवारी रोजी महापौर दालनात आयोजित प्लास्टिक विक्रेत्यांच्या तातडीच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या बैठकीला उपमहापौर मनोज चौधरी, सहायक आयुक्त (आरोग्य) उदय पाटील, वरिष्ठ आरोग्य अधीक्षक रमेश कांबळे, प्लास्टिक विक्रेता असोसिएशनचे अध्यक्ष कमल शामनानी व धनराज चावला, डॉ. लीना पाटील यांच्यासह ‘माझे शहर माझी जबाबदारी’ ग्रुपचे सदस्य आणि प्लास्टिक विक्रेता असोसिएशनचे प्रतिनिधी उपस्थित होते.

​प्रशासनाचा ‘प्लॅन ऑफ ॲक्शन’:
​१ मार्चपर्यंत व्यापाऱ्यांनी आपला प्लास्टिक साठा हटवणे बंधनकारक आहे. मुदतीनंतर प्लास्टिक आढळल्यास पहिल्याच वेळी २५ हजार रुपयांचा दंड आकारला जाईल. दंडासोबतच गरज पडल्यास संबंधित विक्रेत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील. पहिल्या टप्प्यात ‘सिंगल युज प्लास्टिक’ (कॅरिबॅग) पूर्णपणे बंद करण्यावर भर दिला जाणार आहे.

​आरोग्य आणि पर्यावरणाचे रक्षण..
​यावेळी बोलताना उपमहापौर मनोज चौधरी यांनी प्लास्टिकच्या दुष्परिणामांवर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “प्लास्टिकमुळे कॅन्सर, दमा यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढत असून मुक्या जनावरांच्या (गाईंच्या) पोटात प्लास्टिक आढळत आहे. हे चित्र बदलण्यासाठी आता कडक पावले उचलणे गरजेचे आहे.”

​महापौर दीपमाला काळे यांनी प्लास्टिकला पर्याय म्हणून कंपोस्टेबल बॅग्स आणि कापडी पिशव्या वापरण्याचे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे, कापडी पिशव्यांची मागणी वाढल्यास महिला बचत गटांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. १५ मार्च रोजी या मोहिमेचा पुन्हा आढावा घेतला जाणार आहे.

​“जळगावच्या भविष्यातील हितासाठी लोकांची प्लास्टिक वापरण्याची सवय मोडावीच लागेल. ही शेवटची सामंजस्यपूर्वक सूचना आहे, यानंतर कोणतीही पूर्वसूचना न देता थेट ‘कडक’ कारवाई केली जाईल.”
– दीपमाला काळे, महापौर

डॉ. लीना पाटील यांचे पर्यावरणपूरक पर्यायांवर मार्गदर्शन..
​या बैठकीत डॉ. लीना पाटील यांनी प्लास्टिकला सक्षम पर्याय देण्याबाबत महत्त्वपूर्ण मांडणी केली. केवळ प्लास्टिकवर बंदी घालून चालणार नाही, तर नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी पर्यावरणपूरक थैली व साहित्याचा वापर करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. प्लास्टिकमुळे होणारे आरोग्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी कंपोस्टेबल बॅग्स हा एक उत्तम पर्याय असल्याचे त्यांनी यावेळी साहित्यासह पटवून दिले. त्यांच्या या तांत्रिक मार्गदर्शनामुळे व्यापाऱ्यांना प्लास्टिकला पर्याय शोधण्यास मदत होणार आहे.

​नागरिकांसाठी आवाहन:
शहरात कुठेही प्लास्टिकची विक्री होत असल्यास नागरिक थेट महापौर किंवा उपमहापौरांकडे तक्रार करू शकतात.


 

Tags: #jalgaon_city#municipalcorporation
Next Post
जळगावात शिवजयंतीचा उत्साह; शिवकॉलनीत छत्रपती शिवरायांच्या भव्य प्रतिकृतीचे होणार अनावरण

जळगावात शिवजयंतीचा उत्साह; शिवकॉलनीत छत्रपती शिवरायांच्या भव्य प्रतिकृतीचे होणार अनावरण

ताज्या बातम्या

जळगावात भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाचा १७ वा सोहळा; १२ ला विराट रॅली तर १९ एप्रिलला महाशोभायात्रा
जळगाव जिल्हा

जळगावात भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाचा १७ वा सोहळा; १२ ला विराट रॅली तर १९ एप्रिलला महाशोभायात्रा

April 8, 2026
गॅस दरवाढ आणि सक्तीच्या नोंदणी विरोधात उद्या जळगावात रिक्षाचालकांचे आंदोलन
जळगाव जिल्हा

गॅस दरवाढ आणि सक्तीच्या नोंदणी विरोधात उद्या जळगावात रिक्षाचालकांचे आंदोलन

April 7, 2026
दुचाकी चोरणारा अवघ्या १२ तासांत गजाआड!; एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई
गुन्हे

दुचाकी चोरणारा अवघ्या १२ तासांत गजाआड!; एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई

April 7, 2026
जळगाव पंचायत समितीत खा. स्मिता वाघ यांच्याकडून योजनांचा आढावा; कामात गती आणण्याचे निर्देश
जळगाव जिल्हा

जळगाव पंचायत समितीत खा. स्मिता वाघ यांच्याकडून योजनांचा आढावा; कामात गती आणण्याचे निर्देश

April 7, 2026
गिरणा नदीवरील ७ बंधाऱ्यांचे काम रखडले; राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा उपोषणाचा इशारा
जळगाव जिल्हा

गिरणा नदीवरील ७ बंधाऱ्यांचे काम रखडले; राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा उपोषणाचा इशारा

April 6, 2026
३० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, आता नव्या रूपात; जळगावात ‘ऐनक प्लस’ या अत्याधुनिक दालनाचे लोकार्पण!
जळगाव जिल्हा

३० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, आता नव्या रूपात; जळगावात ‘ऐनक प्लस’ या अत्याधुनिक दालनाचे लोकार्पण!

April 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group