• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अशोक जैन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘जैन मॅडरिन-१’ या नवीन संत्रा वाणाचे लोकार्पण

दुसऱ्याच वर्षापासून मिळणार उत्पादन!

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 11, 2026
in कृषी, जळगाव जिल्हा
0
अशोक जैन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘जैन मॅडरिन-१’ या नवीन संत्रा वाणाचे लोकार्पण

जळगाव, (प्रतिनिधी) : जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या ६३ व्या जन्मदिनाच्या औचित्याने, जैन इरिगेशनने संशोधित व विकसित केलेल्या ‘जैन मॅडरिन-१’ या नवीन संत्रा वाणाचे लोकार्पण अशोक जैन व सौ. ज्योती जैन यांच्या हस्ते जैन हिल्स येथील केळीच्या बनात करण्यात आले. या सोहळ्याला जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांचा वारसा भक्कमपणे पुढे नेणाऱ्या जैन परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती. तसेच जैन इरिगेशनचे कृषितज्ज्ञ, शास्त्रज्ञ आणि सहकारी यांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

नव्याने विकसीत केलेल्या जाती ‘जैन मॅडरिन-१’ ही जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड (JISL) यांनी शेतकऱ्यांसाठी विकसित केलेले एक आधुनिक आणि उत्पन्नक्षम संत्र्याचे नवीन वाण आहे. पारंपरिक संत्र्याच्या तुलनेत ही जात लवकर फळधारणा होत असलेली आहे. या वाणामुळे कमी कालावधीत बाजारात येणारा दर्जेदार माल मिळत असल्याने शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्याची संधी वाढते. विशेष म्हणजे दुसऱ्याच वर्षापासून झाडांना फळधारणा सुरू होते, त्यामुळे संत्रा बाग गुंतवणुकीवर लवकर परतावा मिळतो.

या संत्र्याची चव ही नागपूर संत्र्यापेक्षा अधिक गोड असून फळांचा रंग आकर्षक, गडद आणि लालसर केशरी (reddish orange) असतो. फळांचा आकार, सोलण्याची सुलभता आणि रसाळपणा यामुळे ‘जैन मॅडरिन-१’ हा टेबल पर्पज म्हणजेच थेट खाण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. ग्राहकांच्या पसंतीस उतरतील असे दर्जेदार फळ मिळत असल्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेसोबतच निर्यातीसाठीही ही जात आशादायक ठरू शकते असा विश्वास कंपनीचे लिंबू वर्गिय फळांचे संशोधक डॉ. मिलींद लदानिया यांनी सांगितले.

उत्पादनाच्या दृष्टीने ही जात भरघोस उत्पादन देणारी आहे. या जातीचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे फुलधारणा करण्यासाठी पाण्याचा ताण (water stress) देण्याची आवश्यकता नसते, त्यामुळे पाणी व्यवस्थापन अत्यंत सुलभ होते. कमी पाण्यातही स्थिर उत्पादन देणारी ‘जैन मॅडरिन-१’ ही जात बदलत्या हवामानात आणि मर्यादित संसाधनांमध्ये शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक विश्वासार्ह आणि फायदेशीर पर्याय ठरू शकतो.

Tags: #jainirigationJalgaon
Next Post
आ. एकनाथ खडसेंवर सावदा पोलिसात गुन्हा दाखल; पोलीस अधिकारी आणि मंत्र्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप

आ. एकनाथ खडसेंवर सावदा पोलिसात गुन्हा दाखल; पोलीस अधिकारी आणि मंत्र्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप

ताज्या बातम्या

जळगाव महापालिकेचा कचरा ठेकेदाराला दणका; उपमहापौर मनोज चौधरींच्या आक्रमक पवित्र्यानंतर अखेर नोटीस लागू
जळगाव जिल्हा

जळगाव महापालिकेचा कचरा ठेकेदाराला दणका; उपमहापौर मनोज चौधरींच्या आक्रमक पवित्र्यानंतर अखेर नोटीस लागू

April 9, 2026
रिक्षा चालकांचा एल्गार; एलपीजी दरवाढ आणि कल्याणकारी मंडळाच्या जाचक अटींचा निषेध
जळगाव जिल्हा

रिक्षा चालकांचा एल्गार; एलपीजी दरवाढ आणि कल्याणकारी मंडळाच्या जाचक अटींचा निषेध

April 9, 2026
सामूहिक जपातून घुमला विश्वशांतीचा मंत्र; जैन इरिगेशनच्या हजारो सहकाऱ्यांचा सहभाग
जळगाव जिल्हा

सामूहिक जपातून घुमला विश्वशांतीचा मंत्र; जैन इरिगेशनच्या हजारो सहकाऱ्यांचा सहभाग

April 9, 2026
जळगावात भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाचा १७ वा सोहळा; १२ ला विराट रॅली तर १९ एप्रिलला महाशोभायात्रा
जळगाव जिल्हा

जळगावात भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाचा १७ वा सोहळा; १२ ला विराट रॅली तर १९ एप्रिलला महाशोभायात्रा

April 8, 2026
गॅस दरवाढ आणि सक्तीच्या नोंदणी विरोधात उद्या जळगावात रिक्षाचालकांचे आंदोलन
जळगाव जिल्हा

गॅस दरवाढ आणि सक्तीच्या नोंदणी विरोधात उद्या जळगावात रिक्षाचालकांचे आंदोलन

April 7, 2026
दुचाकी चोरणारा अवघ्या १२ तासांत गजाआड!; एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई
गुन्हे

दुचाकी चोरणारा अवघ्या १२ तासांत गजाआड!; एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई

April 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group