• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

ज्येष्ठ नेते शरद पवार पुण्यातील रुग्णालयात दाखल

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 10, 2026
in महाराष्ट्र
0
ज्येष्ठ नेते शरद पवार पुण्यातील रुग्णालयात दाखल

​पुणे, (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांना सोमवारी दुपारी श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्याने पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांच्या विविध चाचण्या केल्या असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

​रुबी हॉल क्लिनिकचे संचालक डॉ. सायमन ग्रॅण्ट यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने पवार यांची तपासणी केली. याबाबत अधिक माहिती देताना डॉ. अभिजित लोढा म्हणाले की, “शरद पवार यांच्या छातीत थोडा कफ जमा झाल्याने त्यांना श्वसनास त्रास होत होता. त्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर असून त्यांना कोणत्याही प्रकारच्या ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरची आवश्यकता नाही.”

​डॉक्टरांचे निरीक्षण आणि खबरदारी..
​खबरदारीचा उपाय म्हणून शरद पवार यांना सध्या रुग्णालयातील खासगी कक्षात ठेवण्यात आले असून, पुढील २४ तास ते डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली राहतील. प्रकृतीमध्ये सुधारणा होत असली तरी विश्रांतीची गरज असल्याने त्यांना दाखल करून घेण्यात आले आहे.

​कार्यकर्त्यांना आवाहन..
​पवार यांना रुग्णालयात दाखल केल्याचे वृत्त समजताच कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. मात्र, रुग्णालय प्रशासनाने आणि पक्षाकडून कार्यकर्त्यांना रुग्णालय परिसरात गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पवारांची प्रकृती उत्तम असून काळजीचे कोणतेही कारण नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.

Tags: #ncpsharadpawar#sharadpawar
Next Post
महाराष्ट्र अंनिसच्या शाखा कार्याध्यक्षपदी मिनाक्षी चौधरी, सचिवपदी हेमंत सोनवणे

महाराष्ट्र अंनिसच्या शाखा कार्याध्यक्षपदी मिनाक्षी चौधरी, सचिवपदी हेमंत सोनवणे

ताज्या बातम्या

जळगाव महापालिकेचा कचरा ठेकेदाराला दणका; उपमहापौर मनोज चौधरींच्या आक्रमक पवित्र्यानंतर अखेर नोटीस लागू
जळगाव जिल्हा

जळगाव महापालिकेचा कचरा ठेकेदाराला दणका; उपमहापौर मनोज चौधरींच्या आक्रमक पवित्र्यानंतर अखेर नोटीस लागू

April 9, 2026
रिक्षा चालकांचा एल्गार; एलपीजी दरवाढ आणि कल्याणकारी मंडळाच्या जाचक अटींचा निषेध
जळगाव जिल्हा

रिक्षा चालकांचा एल्गार; एलपीजी दरवाढ आणि कल्याणकारी मंडळाच्या जाचक अटींचा निषेध

April 9, 2026
सामूहिक जपातून घुमला विश्वशांतीचा मंत्र; जैन इरिगेशनच्या हजारो सहकाऱ्यांचा सहभाग
जळगाव जिल्हा

सामूहिक जपातून घुमला विश्वशांतीचा मंत्र; जैन इरिगेशनच्या हजारो सहकाऱ्यांचा सहभाग

April 9, 2026
जळगावात भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाचा १७ वा सोहळा; १२ ला विराट रॅली तर १९ एप्रिलला महाशोभायात्रा
जळगाव जिल्हा

जळगावात भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाचा १७ वा सोहळा; १२ ला विराट रॅली तर १९ एप्रिलला महाशोभायात्रा

April 8, 2026
गॅस दरवाढ आणि सक्तीच्या नोंदणी विरोधात उद्या जळगावात रिक्षाचालकांचे आंदोलन
जळगाव जिल्हा

गॅस दरवाढ आणि सक्तीच्या नोंदणी विरोधात उद्या जळगावात रिक्षाचालकांचे आंदोलन

April 7, 2026
दुचाकी चोरणारा अवघ्या १२ तासांत गजाआड!; एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई
गुन्हे

दुचाकी चोरणारा अवघ्या १२ तासांत गजाआड!; एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई

April 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group