• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जिल्हा परिषदेच्या ४ कर्मचाऱ्यांचे निलंबन; दिव्यांग प्रमाणपत्रात आढळली तफावत

मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांची धडक कारवाई

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 19, 2026
in खान्देश, जळगाव जिल्हा
0
जिल्हा परिषदेच्या ४ कर्मचाऱ्यांचे निलंबन; दिव्यांग प्रमाणपत्रात आढळली तफावत

​जळगाव, (प्रतिनिधी) : राज्याच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या आदेशानुसार सुरू असलेल्या विशेष तपासणी मोहिमेत, दिव्यांग प्रमाणपत्रातील टक्केवारीत मोठी तफावत आढळून आल्याने जळगाव जिल्हा परिषदेच्या चार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची गाज पडली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मिनल करनवाल यांनी बुधवारी, १४ जानेवारी रोजी या कारवाईचे आदेश दिले आहेत.

​राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागामार्फत सध्या सर्व दिव्यांग कर्मचारी व व्यक्तींच्या ‘UID’ कार्डची आणि प्रमाणपत्रांची कसून तपासणी केली जात आहे. जळगाव जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या तपासणी दरम्यान, चार कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या प्रमाणपत्रातील दिव्यांगत्वाची टक्केवारी आणि प्रत्यक्षातील निकष यात तफावत असल्याचे समोर आले. या गंभीर बाबीची दखल घेत प्रशासनाने तातडीने निलंबनाचे पाऊल उचलले आहे.

​निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे:
​निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये प्रामुख्याने आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे:
१. भालचंद्र नारायण पवार – आरोग्य सहाय्यक, जिल्हा प्रशिक्षण केंद्र, जळगाव.
२. छाया घनश्याम भोळे – आरोग्य सहाय्यिका, प्राथमिक आरोग्य केंद्र, वाघोड.
३. संदीप विनायक सोनवणे – आरोग्य सेवक, प्राथमिक आरोग्य केंद्र, तरवडे (ता. चाळीसगाव).
४. गणेश मुरलीधर महाजन – आरोग्य सहाय्यक, पिंपरखेड (ता. भडगाव).

​गैरप्रकाराला चाप बसणार..
​यापूर्वीही अशाच प्रकारे दिव्यांग टक्केवारीत तफावत आढळल्याने चार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा चार जणांवर कारवाई झाल्याने जिल्हा परिषद वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. “बनावट प्रमाणपत्रे किंवा निकषात बसत नसतानाही दिव्यांग सवलतींचा लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही,” असा कडक संदेश या कारवाईतून प्रशासनाने दिला आहे.

​सध्या सुरू असलेल्या या तपासणी मोहिमेमुळे अनेक ‘बोगस’ दिव्यांग प्रमाणपत्रे समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, आगामी काळात आणखी काही कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याची चिन्हे आहेत.
​

ताज्या बातम्या

जिल्हा परिषदेच्या ४ कर्मचाऱ्यांचे निलंबन; दिव्यांग प्रमाणपत्रात आढळली तफावत
खान्देश

जिल्हा परिषदेच्या ४ कर्मचाऱ्यांचे निलंबन; दिव्यांग प्रमाणपत्रात आढळली तफावत

January 19, 2026
जैन इरिगेशनच्या कृषी महोत्सवास शेतकऱ्यांचा प्रतिसाद
कृषी

जैन इरिगेशनच्या कृषी महोत्सवास शेतकऱ्यांचा प्रतिसाद

January 19, 2026
राष्ट्रीय योगासन स्पर्धेत आर्टिस्टिक पेअरमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
क्रिडा

राष्ट्रीय योगासन स्पर्धेत आर्टिस्टिक पेअरमध्ये महाराष्ट्र आघाडीवर

January 18, 2026
चोपड्याच्या जिरायत पाडा येथे अंनिसतर्फे चमत्कारांचे सादरीकरण, प्रबोधन
जळगाव जिल्हा

चोपड्याच्या जिरायत पाडा येथे अंनिसतर्फे चमत्कारांचे सादरीकरण, प्रबोधन

January 18, 2026
एसटी प्रशासनाचा ‘रामभरोसे’ कारभार; डोळ्यासमोर बस असूनही चौकशी खिडकीतून प्रवाशांची दिशाभूल!
खान्देश

एसटी प्रशासनाचा ‘रामभरोसे’ कारभार; डोळ्यासमोर बस असूनही चौकशी खिडकीतून प्रवाशांची दिशाभूल!

January 18, 2026
जळगावात २३ जानेवारीपासून ‘बहिणाबाई महोत्सवा’चा जागर; खाद्यसंस्कृती आणि मनोरंजनाची मेजवानी
खान्देश

जळगावात २३ जानेवारीपासून ‘बहिणाबाई महोत्सवा’चा जागर; खाद्यसंस्कृती आणि मनोरंजनाची मेजवानी

January 18, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group