• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जैन इरिगेशनच्या कृषी महोत्सवास शेतकऱ्यांचा प्रतिसाद

३० जानेवारीपर्यंत शेतीतील प्रयोग पाहता येणार

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 19, 2026
in कृषी, खान्देश, जळगाव जिल्हा
0
जैन इरिगेशनच्या कृषी महोत्सवास शेतकऱ्यांचा प्रतिसाद

जळगाव, (प्रतिनिधी) : – जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडच्या जैन हिल्स येथे सुरू असलेल्या कृषी महोत्सवाला शेतकऱ्यांकडून मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादामुळे हा महोत्सव १४ जानेवारीऐवजी आता ३० जानेवारी २०२६ पर्यंत वाढविण्यात आला आहे. १२ डिसेंबरपासून आजपर्यंत देशाच्या कानाकोपऱ्यातून तसेच महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमधून सुमारे ३२ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी या महोत्सवाला भेट दिली. जैन हिल्सवरील हा कृषी महोत्सव म्हणजे केवळ प्रदर्शन नव्हे, तर प्रत्यक्ष शेतीत वापरता येईल असे अत्याधुनिक तंत्रज्ञान पाहण्याची आणि अनुभवण्याची संधी आहे.

शेतकरी येथे येऊन नव्या शेती पद्धती, सुधारित वाण, सूक्ष्म सिंचन व्यवस्था आणि प्रिसिजन शेतीची प्रत्यक्ष प्रात्यक्षिके पाहत आहेत आणि त्यातून प्रेरणा घेऊन परत जात आहेत. उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख पिकांपैकी कांदा, केळी हे पीक आहेत. प्रक्रियेसाठी वापरल्या जाणाऱ्या पांढऱ्या कांद्याच्या सुधारित व्हरायटी, टोमॅटो लागवड, तसेच करार शेतीच्या माध्यमातून हमी भावाने कांदा व टोमॅटो खरेदीची व्यवस्था कशी उभी केली जाते, याचे सविस्तर मार्गदर्शन येथे मिळत आहे. यासोबतच डाळिंब, मोसंबी, जैन स्वीट ऑरेंज, आंबा, पपई आदी फळपिकांच्या लागवड पद्धतींमध्ये झालेल्या बदलांची माहिती देण्यात येत आहे. अतिसघन लागवड पद्धतीमुळे कमी जागेत, कमी पाण्यात आणि कमी खर्चात अधिक उत्पन्न कसे मिळू शकते, याची प्रत्यक्ष उदाहरणे शेतकऱ्यांसमोर मांडण्यात आली आहेत.

सूक्ष्म सिंचन क्षेत्रात ठिबक व तुषार सिंचनासह जैन ऑटोमेशन प्रणालीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. ५० ते १०० एकर किंवा त्याहून अधिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही प्रणाली कशी उपयुक्त ठरते, सिंचन व फर्टिगेशनद्वारे खतांचे अचूक नियंत्रण कसे साधता येते आणि मजुरीवरील अतिरिक्त खर्च कसा कमी होतो, याचे प्रात्यक्षिक येथे पाहायला मिळत आहे. जैन हिल्सवरील कृषी महोत्सव हा खऱ्या अर्थाने हायटेक शेती, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा संगम आहे. प्रत्यक्ष उभ्या पिकांवर केलेले प्रयोग, शास्त्रोक्त पद्धतींची प्रात्यक्षिके आणि जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान यामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढताना दिसत आहे. यावर्षी ‘सायन्स-टेक@वर्क’ ही संकल्पना घेऊन हायटेक, प्रिसिजन आणि क्लायमेट स्मार्ट शेतीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी खुले करण्यात आले आहे. अधिकाधिक शेतकरी बांधवांनी जैन हिल्स येथे येऊन या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जैन इरिगेशनच्यावतीने करण्यात आले आहे.


 

Tags: #jainirigation
Next Post
जिल्हा परिषदेच्या ४ कर्मचाऱ्यांचे निलंबन; दिव्यांग प्रमाणपत्रात आढळली तफावत

जिल्हा परिषदेच्या ४ कर्मचाऱ्यांचे निलंबन; दिव्यांग प्रमाणपत्रात आढळली तफावत

ताज्या बातम्या

महापालिकेत ‘सत्ता’ आपली, पण ‘शिस्त’ कोणाची? भाजपमधील अंतर्गत खदखद चव्हाट्यावर!
जळगाव जिल्हा

महापालिकेत ‘सत्ता’ आपली, पण ‘शिस्त’ कोणाची? भाजपमधील अंतर्गत खदखद चव्हाट्यावर!

March 6, 2026
अवैध वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या ३४ वाहनांचा १२ मार्च रोजी लिलाव
जळगाव जिल्हा

अवैध वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या ३४ वाहनांचा १२ मार्च रोजी लिलाव

March 5, 2026
पोलिसांची मोठी कारवाई; ६३ किलो गांजासह दोन कार जप्त, सहा आरोपींना बेड्या
गुन्हे

पोलिसांची मोठी कारवाई; ६३ किलो गांजासह दोन कार जप्त, सहा आरोपींना बेड्या

March 4, 2026
जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम
जळगाव जिल्हा

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

March 2, 2026
प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group