जळगाव, (प्रतिनिधी) : येथील जळगाव महिला मंडळाच्या वतीने शनिवार, दिनांक १७ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजता हळदी-कुंकू व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील सूर्यवंशी क्षत्रिय मराठा बोर्डिंग (आंबेडकर मार्केट समोर) येथे हा सोहळा पार पडणार आहे.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे ‘लकी ड्रॉ’ असून, त्यातील विजेत्या महिलेला आकर्षक पैठणी देऊन गौरविण्यात येणार आहे. यासोबतच नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या महिलांचा विशेष सत्कार आणि मंडळाच्या नवीन कार्यकारिणीची निवडही याच कार्यक्रमात केली जाणार आहे.
विविध स्पर्धांचे आयोजन..
कार्यक्रमाचे औचित्य साधून महिलांसाठी दोन प्रमुख स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे:
रांगोळी स्पर्धा: दुपारी १:३० वाजता ही स्पर्धा सुरू होईल. स्पर्धकांनी रांगोळी घरून आणायची आहे.
उखाणे स्पर्धा: कार्यक्रमादरम्यान महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी उखाणे स्पर्धा घेण्यात येईल.
या दोन्ही स्पर्धांमधील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. कार्यक्रमाच्या शेवटी हळदी-कुंकू, वाण वाटप आणि अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले आहे.
नाव नोंदणीसाठी आवाहन..
रांगोळी आणि उखाणे स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या महिलांनी आपली नावे ९५६१८८०९४४ किंवा ८०५५११७८०७ या क्रमांकावर नोंदवावीत. या स्नेहसोहळ्याला जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जळगाव महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.







