जळगाव, (प्रतिनिधी) : आगामी जळगाव महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक शिस्तीचा मोठा बडगा उगारला आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी तब्बल २७ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. या धडक कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.
शिस्तभंगाचा ठपका..
महानगरपालिका निवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यान पक्षाची धोरणे आणि वरिष्ठ पातळीवर घेतलेल्या निर्णयांचे उल्लंघन केल्याचे या २७ जणांच्या बाबतीत दिसून आले. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात भूमिका घेणे किंवा संघटनात्मक कार्यात अडथळा आणणे, यांसारख्या बाबी कोअर कमिटीच्या निदर्शनास आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा होऊन, या सर्व बंडखोरांचे प्राथमिक सदस्यत्व आणि पदे तातडीने रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
”पक्षहित आणि संघटनात्मक शिस्त आमच्यासाठी सर्वोच्च आहे. शिस्तीचा भंग करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. हा निर्णय पक्ष मजबुतीसाठी घेण्यात आला असून तो तात्काळ लागू करण्यात आला आहे.”
— दीपक सूर्यवंशी, (महानगर जिल्हाध्यक्ष, भाजप जळगाव)
पक्षाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आलेले पदाधिकारी:
१. पाटील संगीता गोकुळ
२. हर्षदा अमोल सांगोरे
३. बाविस्कर धनश्री गणेश
४. बाविस्कर गणेश दत्तात्रय
५. सपकाळे रंजना भरत
६. कांचन विकास सोनवणे
७. शिंपी प्रमोद शांताराम
८. सपकाळे भरत शंकर
९. बागरे हिरकणी जितेंद्र
१०. चौधरी चेतना किशोर
११. बारी मयूर श्रावण
१२. पाटील तृप्ती पांडुरंग
१३. पाटील सुनील ज्ञानेश्वर
१४. विकास प्रल्हाद पाटील
१५. भोळे गिरीश कैलास
१६. कैलास बुधा पाटील (सूर्यवंशी)
१७. हेमंत सुभाष भंगाळे
१८. जितेंद्र भगवान मराठे
१९. प्रिया विनय केसवानी
२०. चौधरी रूपाली स्वप्नील
२१. अंजू योगेश निंबाळकर
२२. चौथै मयुरी जितेंद्र
२३. वंजारी जयश्री गजानन
२४. पाटील ज्योती विठ्ठल
२५. घुगे उज्वला संजय
२६. ढाकणे दिनेश मधुकर
२७. मोरे कोकीळा प्रमोद








