• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

प्रभाग १२ मध्ये परिवर्तनाचे वारे; ललितकुमार घोगले यांच्या प्रचारफेरीला जनसामान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महायुतीच्या कारभारावर नागरिक नाराज; तरुण आणि सुशिक्षित नेतृत्वाला पसंती

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
January 8, 2026
in खान्देश, जळगाव जिल्हा, राजकीय
0
प्रभाग १२ मध्ये परिवर्तनाचे वारे; ललितकुमार घोगले यांच्या प्रचारफेरीला जनसामान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

​जळगाव, (प्रतिनिधी) : आगामी महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक १२ ‘अ’ मधील राजकीय चित्र आता स्पष्ट होऊ लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे अधिकृत उमेदवार ललितकुमार घोगले यांच्या प्रचाराने वेग घेतला असून, एका तरुण आणि विकासाची दृष्टी असलेल्या नेतृत्वाच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार प्रभागातील नागरिकांनी केल्याचे चित्र दिसत आहे.

​प्रचारफेरीतून शक्तिप्रदर्शन..
ललितकुमार घोगले यांनी प्रभागात काढलेल्या प्रचारफेरीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून घोगले यांना आपला पाठिंबा दर्शवला. गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख असल्याने मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल कमालीची ओढ दिसून येत आहे.

 

​सत्ताधाऱ्यांविरोधात संताप..
प्रभागातील नागरिकांनी महायुतीच्या गेल्या काही वर्षांतील कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महायुतीने जळगावकरांची निराशा केली असून, प्रभाग १२ मध्ये पुन्हा एकदा तेच निष्क्रिय उमेदवार रिंगणात उतरवल्याने मतदारांमध्ये संतापाची लाट आहे. “आम्हाला रस्ते, गटारी यांसोबतच प्रभागाचा सर्वांगीण विकास करणारा लोकप्रतिनिधी हवा आहे,” अशी भावना सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

​विकासाचे ‘व्हिजन’ असलेले नेतृत्व..
ललितकुमार घोगले हे केवळ आश्वासनं देणारे उमेदवार नसून, प्रभागाचा कायापालट करण्यासाठी त्यांच्याकडे ठोस कृती आराखडा (व्हिजन) आहे. युवकांचे संघटन आणि स्थानिक प्रश्नांची सखोल जाण ही त्यांची जमेची बाजू मानली जात आहे. रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आणि प्रभागाला नवी ऊर्जा देण्यासाठी तरुण रक्ताची गरज असल्याचे समर्थकांचे म्हणणे आहे.

​”प्रभागाचा विकास हीच माझी प्राथमिकता आहे. नागरिकांनी दिलेला विश्वास मी सार्थ ठरवीन आणि प्रभाग १२ ला जळगावमधील एक आदर्श प्रभाग बनवीन.”
– ललितकुमार घोगले (उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस – श.प. पक्ष)
​


 

Tags: #jalgaon_city#political
Next Post
जनसंपर्काचा ‘किंग मेकर’: जळगावच्या राजकारणात आमदार राजू मामांचा दबदबा!

जनसंपर्काचा 'किंग मेकर': जळगावच्या राजकारणात आमदार राजू मामांचा दबदबा!

ताज्या बातम्या

दृष्टीहीन व अपंग बांधवांना दिवाळीनिमित्त मिठाई व फरसाण वाटप
जळगाव जिल्हा

दृष्टीहीन व अपंग बांधवांना दिवाळीनिमित्त मिठाई व फरसाण वाटप

November 7, 2026
जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक नेत्र आणि बाल अतिदक्षता विभागाचे लोकार्पण
आरोग्य

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक नेत्र आणि बाल अतिदक्षता विभागाचे लोकार्पण

November 6, 2026
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने सदस्यांना मोठ्या उत्साहात मिठाई वाटप
जळगाव जिल्हा

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने सदस्यांना मोठ्या उत्साहात मिठाई वाटप

November 6, 2026
शिक्षणासोबत उद्योगानुभवाची संधी! गोदावरीच्या ६८ विद्यार्थ्यांची नऊ कंपन्यांमध्ये निवड
जळगाव जिल्हा

शिक्षणासोबत उद्योगानुभवाची संधी! गोदावरीच्या ६८ विद्यार्थ्यांची नऊ कंपन्यांमध्ये निवड

November 6, 2026
जळगावच्या विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर; आमदार सुरेश भोळे यांच्या पाठपुराव्याला यश
जळगाव जिल्हा

जळगावच्या विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर; आमदार सुरेश भोळे यांच्या पाठपुराव्याला यश

November 6, 2026
जैन इरिगेशनच्या एकत्रित महसुलात १०.१ टक्क्यांची वाढ
खान्देश

जैन इरिगेशनच्या एकत्रित महसुलात १०.१ टक्क्यांची वाढ

November 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add