जळगाव, (प्रतिनिधी) : आगामी महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक १२ ‘अ’ मधील राजकीय चित्र आता स्पष्ट होऊ लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे अधिकृत उमेदवार ललितकुमार घोगले यांच्या प्रचाराने वेग घेतला असून, एका तरुण आणि विकासाची दृष्टी असलेल्या नेतृत्वाच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार प्रभागातील नागरिकांनी केल्याचे चित्र दिसत आहे.
प्रचारफेरीतून शक्तिप्रदर्शन..
ललितकुमार घोगले यांनी प्रभागात काढलेल्या प्रचारफेरीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून घोगले यांना आपला पाठिंबा दर्शवला. गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख असल्याने मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल कमालीची ओढ दिसून येत आहे.
सत्ताधाऱ्यांविरोधात संताप..
प्रभागातील नागरिकांनी महायुतीच्या गेल्या काही वर्षांतील कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महायुतीने जळगावकरांची निराशा केली असून, प्रभाग १२ मध्ये पुन्हा एकदा तेच निष्क्रिय उमेदवार रिंगणात उतरवल्याने मतदारांमध्ये संतापाची लाट आहे. “आम्हाला रस्ते, गटारी यांसोबतच प्रभागाचा सर्वांगीण विकास करणारा लोकप्रतिनिधी हवा आहे,” अशी भावना सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
विकासाचे ‘व्हिजन’ असलेले नेतृत्व..
ललितकुमार घोगले हे केवळ आश्वासनं देणारे उमेदवार नसून, प्रभागाचा कायापालट करण्यासाठी त्यांच्याकडे ठोस कृती आराखडा (व्हिजन) आहे. युवकांचे संघटन आणि स्थानिक प्रश्नांची सखोल जाण ही त्यांची जमेची बाजू मानली जात आहे. रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आणि प्रभागाला नवी ऊर्जा देण्यासाठी तरुण रक्ताची गरज असल्याचे समर्थकांचे म्हणणे आहे.
”प्रभागाचा विकास हीच माझी प्राथमिकता आहे. नागरिकांनी दिलेला विश्वास मी सार्थ ठरवीन आणि प्रभाग १२ ला जळगावमधील एक आदर्श प्रभाग बनवीन.”
– ललितकुमार घोगले (उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस – श.प. पक्ष)








