• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगाव मनपा निवडणुक: दिग्गज बाद, नव्या चेहऱ्यांना संधी! तर निष्ठावंतांमध्ये नाराजीचा सूर

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
December 30, 2025
in खान्देश, जळगाव जिल्हा, राजकीय
0
जळगाव मनपा निवडणुक: दिग्गज बाद, नव्या चेहऱ्यांना संधी! तर निष्ठावंतांमध्ये नाराजीचा सूर

​जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव शहर महानगरपालिकेच्या रणधुमाळीत मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या टप्प्यात इच्छुकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. याच धावपळीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या जागावाटपाचे आणि अधिकृत उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाले आहे. अनेक प्रभागांत धक्कातंत्राचा अवलंब करत दिग्गजांचे पत्ते कट करण्यात आले असून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

​प्रभागनिहाय उमेदवारीचे चित्र खालीलप्रमाणे:

​प्रभाग ११ व १२: प्रभाग ११ शिवसेनेच्या वाट्याला आला असून येथे डॉ. अमृता सोनवणे, संतोष पाटील, सिंधुताई कोल्हे आणि ललित कोल्हे निवडणूक लढवणार आहेत. प्रभाग १२ भाजपकडे असून येथे अनिल अडकमोल, उज्वला बेंडाळे, गायत्री राणे आणि नितीन बरडे यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे.

​प्रभाग ८ व ९: प्रभाग ८ मध्ये मानसी भोईटे, कविता पाटील आणि अमर जैन (भाजप) यांना संधी मिळाली आहे, तर एक जागा शिवसेनेसाठी सोडली आहे. प्रभाग ९ मध्ये संमिश्र चित्र असून मनोज चौधरी, प्रतिभा देशमुख (शिवसेना) तर जयश्री पाटील व डॉ. चंद्रशेखर पाटील (भाजप) उमेदवार असतील.

​प्रभाग ७ व १०: प्रभाग ७ मधून दीपमाला काळे, अंकिता पाटील, विशाल भोळे आणि चंद्रशेखर अत्तरदे या भाजपच्या उमेदवारांची नावे निश्चित झाली आहेत. प्रभाग १० मध्ये अतुल बारी, किरण भोई, सुरेश सोनवणे आणि जाकिर पठाण यांना भाजपने तिकीट दिले आहे.

​प्रभाग १७ व १३: प्रभाग १७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पूर्ण ताकदीनिशी उतरली असून हिना पिंजारी, सुमय्या पिंजारी, इकबालुद्दीन पिरजादे आणि प्रशांत नाईक ‘घड्याळ’ चिन्हावर लढणार आहेत. प्रभाग १३ मध्ये भाजपने मोठे फेरबदल करत जितेंद्र मराठे व अंजना सोनवणे यांचा पत्ता कट केला असून नितीन सपके, सुरेखा तायडे, वैशाली पाटील यांना संधी दिली आहे, तर ‘ड’ मधून प्रफुल्ल देवकर (राष्ट्रवादी-अजित पवार गट) रिंगणात आहेत.

​प्रभाग १५, १८ व १९: प्रभाग १५ मध्ये भाजपचे भगत बालानी, चेतन शिरसाळे, अरविंद देशमुख तर शिवसेनेच्या रेश्मा काळे उमेदवार आहेत. प्रभाग १८ पूर्णपणे शिवसेनेकडे असून डॉ. गौरव सोनवणे, नलुबाई सोनवणे, प्रतिभा भापसे निवडणूक लढवतील. प्रभाग १९ मध्ये रेखा पाटील, विक्रम सोनवणे, प्रतिभा देशमुख (शिवसेना) आणि राजेंद्र घुगे पाटील यांची नावे निश्चित झाली आहेत.

​निष्ठावंतांचा संताप..
उमेदवारी जाहीर होताच भाजपमध्ये नाराजीचे नाट्य रंगले आहे. अनेक वर्षांपासून पक्षाचे काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून नव्यांना संधी दिल्याने कार्यकर्त्यांनी निवडणूक प्रमुख आमदार राजूमामा भोळे यांच्याकडे आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तिकीट कापल्या गेलेल्या नेत्यांच्या भूमिकेकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.


 

Next Post
मनपा रणसंग्राम: प्रभाग ७ मधून अंकिता पंकज पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल; ‘कमळ’ फुलवण्याचा निर्धार!

मनपा रणसंग्राम: प्रभाग ७ मधून अंकिता पंकज पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल; 'कमळ' फुलवण्याचा निर्धार!

ताज्या बातम्या

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या
जळगाव जिल्हा

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 26, 2026
रावेर पोलिसांची मोठी कारवाई; बुऱ्हाणपूरच्या व्यापाऱ्याला लुटणारे ७ संशयित जेरबंद!
गुन्हे

रावेर पोलिसांची मोठी कारवाई; बुऱ्हाणपूरच्या व्यापाऱ्याला लुटणारे ७ संशयित जेरबंद!

February 25, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group