• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगाव महापालिका निवडणूक: आजपासून ‘रणसंग्राम’; उमेदवारी अर्जांची प्रक्रिया सुरू

३० डिसेंबरपर्यंत मुदत; राजकीय हालचालींना वेग, इच्छुकांची धावपळ वाढली

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 23, 2025
in खान्देश, जळगाव जिल्हा
0
जळगाव महापालिका निवडणूक: आजपासून ‘रणसंग्राम’; उमेदवारी अर्जांची प्रक्रिया सुरू

​जळगाव, (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे लागले आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज (नामनिर्देशनपत्र) दाखल करण्याच्या प्रक्रियेला आज, मंगळवार (दि. २३) पासून प्रारंभ होत आहे. अर्ज भरण्यासाठी ३० डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली असून, या प्रक्रियेमुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

​नगरपालिकांच्या निकालानंतर आता महापालिकेत सत्ता काबीज करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आजपासून निवडणूक कार्यालयात नामनिर्देशनपत्रे वाटप करणे आणि ती स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होईल. इच्छुकांना आपले अर्ज भरण्यासाठी अवघे आठ दिवस मिळणार असल्याने कागदपत्रांची जुळवाजुळव आणि शक्तिप्रदर्शनासाठी उमेदवारांची मोठी धावपळ सुरू झाली आहे.

​निवडणुकीचा असा असेल पुढील टप्पा:
इच्छुक उमेदवारांना आपले अर्ज २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत सादर करता येतील. प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी ३१ डिसेंबर रोजी केली जाईल. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २ जानेवारी असून, त्यानंतर ३ जानेवारी रोजी उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले जाईल आणि अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे आणि दुसऱ्याच दिवशी, १६ जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल.

​नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये अनपेक्षित निकाल पाहायला मिळाल्याने, आता महापालिकेत कोण बाजी मारणार, याबाबत संपूर्ण जिल्ह्यात कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात होत असल्याने जळगाव शहरात खऱ्या अर्थाने राजकीय रणधुमाळीला वेग येणार आहे.

Tags: #elections#jalgaon_city#municipalcorporation
Next Post
वसा जनसेवेचा, तरुण व्यक्तिमत्व पंकज पाटील : नवीन व्हिजन, तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मूलभूत विकास साधणार

वसा जनसेवेचा, तरुण व्यक्तिमत्व पंकज पाटील : नवीन व्हिजन, तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मूलभूत विकास साधणार

ताज्या बातम्या

यावल तालुक्यातील डांभुर्णीत हवेत गोळीबार; कोळन्हावी ग्रामपंचायतीच्या सरपंचाला अटक
खान्देश

यावल तालुक्यातील डांभुर्णीत हवेत गोळीबार; कोळन्हावी ग्रामपंचायतीच्या सरपंचाला अटक

August 28, 2026
भरचौकात हवेत गोळीबार करणारा कोळन्हावीचा सरपंच अटकेत; गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त
गुन्हे

भरचौकात हवेत गोळीबार करणारा कोळन्हावीचा सरपंच अटकेत; गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त

August 28, 2026
हॉकर्सच्या प्रश्नावर जळगाव मनपा ॲक्शन मोडमध्ये; उपमहापौर यांनी केली खाऊ गल्लीची पाहणी
जळगाव जिल्हा

हॉकर्सच्या प्रश्नावर जळगाव मनपा ॲक्शन मोडमध्ये; उपमहापौर यांनी केली खाऊ गल्लीची पाहणी

August 28, 2026
धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई
जळगाव जिल्हा

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

August 27, 2026
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ७२ वर्षीय महिलेवर पामीची यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ७२ वर्षीय महिलेवर पामीची यशस्वी शस्त्रक्रिया

August 27, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

अंजोळा शिवारातील शेडमधून ४० हजारांचा मुद्देमाल लांबवला; यावल पोलिसांत गुन्हा दाखल

August 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add