• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगाव नाका परिसरात गोळीबार; लुटमारीला विरोध केल्याने तरुणावर हल्ला

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
December 18, 2025
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
जळगाव नाका परिसरात गोळीबार; लुटमारीला विरोध केल्याने तरुणावर हल्ला

​भुसावळ, (प्रतिनिधी) : शहरातील जळगाव नाका परिसरात बुधवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. पानाच्या टपरीवर लुटमार करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चौघांना विरोध केला असता, त्यांनी ३९ वर्षीय तरुणावर थेट गोळी झाडली. या हल्ल्यात उल्हास गणेश पाटील (वय ३९) हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर जळगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

​​जळगाव नाका परिसरातून खळवाडीकडे जाणाऱ्या पुलाच्या बाजूला स्वर्गीय नारायण पाटील व्यापारी संकुल आहे. या संकुलाजवळ असलेल्या पानाच्या टपरीवर बुधवारी रात्री चार अज्ञात तरुण आले. त्यांनी टपरीवर गोंधळ घालण्यास सुरुवात केली आणि गल्ल्यातील रोकड पळवण्याचा प्रयत्न केला. यावेळी टपरीवर असलेल्या उल्हास पाटील यांनी या प्रकाराला जोरदार विरोध केला. ​याच वादातून एका संशयिताने आपल्या कमरेतून बंदूक काढून उल्हास पाटील यांच्यावर गोळी झाडली. गोळी उजव्या खांद्याला लागल्याने पाटील खाली कोसळले. गोळीबाराचा आवाज होताच परिसरात एकच खळबळ उडाली, दरम्यान चारही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

जखमी उल्हास पाटील यांना सुरुवातीला खासगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने जळगाव येथे हलवण्यात आले.

​घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनीही घटनास्थळाला भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. फॉरेन्सिक एक्सपर्टच्या पथकाने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आहेत.
​

​भरवस्तीत आणि वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या या गोळीबारामुळे जळगाव नाका परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. लुटमारीच्या उद्देशाने झालेला हा हल्ला आहे की यामागे काही जुना वाद आहे, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

Tags: BhusawalCrimePolice
Next Post
जुन्या वादातून मित्राचाच काटा काढला; खून करून मृतदेह धरणात फेकला

जुन्या वादातून मित्राचाच काटा काढला; खून करून मृतदेह धरणात फेकला

ताज्या बातम्या

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या
जळगाव जिल्हा

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 26, 2026
रावेर पोलिसांची मोठी कारवाई; बुऱ्हाणपूरच्या व्यापाऱ्याला लुटणारे ७ संशयित जेरबंद!
गुन्हे

रावेर पोलिसांची मोठी कारवाई; बुऱ्हाणपूरच्या व्यापाऱ्याला लुटणारे ७ संशयित जेरबंद!

February 25, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group