• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

धक्कादायक! अल्पवयीन पुतणीवर पोलिस मावस काकाकडून अत्याचार; गर्भपात करणारा डॉक्टर अटकेत

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 11, 2025
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
धक्कादायक! अल्पवयीन पुतणीवर पोलिस मावस काकाकडून अत्याचार; गर्भपात करणारा डॉक्टर अटकेत

​पाचोरा, (प्रतिनिधी) : तालुक्यात अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका मावस काकाने आपल्या अल्पवयीन पुतणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अत्याचारामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिल्याचे उघडकीस आले असून, त्यानंतर तिचा गर्भपातही करण्यात आला. याप्रकरणी संशयित पोलीस काकाविरुद्ध पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर गर्भपात करणारा डॉक्टर रवींद्र पाटील याला अटक करण्यात आली आहे.

​अल्पवयीन मुलगी आपल्या आजी-आजोबांसोबत राहत होती. तिचा मावस काका, जो मुंबई पोलीस दलात कार्यरत आहे, त्याने जून २०२५ मध्ये या मुलीवर अत्याचार केला. या घृणास्पद कृत्याची वाच्यता केल्यास ‘तुला पोलीस होऊ देणार नाही,’ अशी धमकी त्याने पीडितेला दिली होती. ऑक्टोबर महिन्यात मुलीला उलट्यांचा त्रास सुरू झाला. तिने आजीला ही माहिती दिली. आजीने तिला पाचोरा येथे आणून सोनोग्राफी केली असता, ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. पीडितेच्या आईच्या संमतीने डॉ. रवींद्र पाटील यांनी गोळ्या देऊन तिचा गर्भपात घडवून आणला.


​गुन्हा दाखल आणि डॉक्टरला अटक..
​दरम्यान, या पीडित मुलीनेच जळगाव येथील महिला दक्षता समितीला व्हॉट्सॲप मेसेजद्वारे मदतीची विनंती केली. समितीने तात्काळ पाचोरा पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी ८ डिसेंबर रोजी मुलीला पोलीस ठाण्यात बोलावून तिची रीतसर फिर्याद नोंदवून घेतली. या फिर्यादीवरून, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी संशयित मावस काकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, मुलीचा गर्भपात करणाऱ्या डॉ. रवींद्र पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे तालुक्यात संतापाचे वातावरण पसरले आहे. पोलीस काकाचा पुढील तपास सुरू आहे.
​


 

Tags: #pachoraCrimePolice
Next Post
जळगावमध्ये थंडीचा कहर! पारा थेट ७ अंशांवर, सहा वर्षांतील नीचांकी तापमानाची नोंद

जळगावमध्ये थंडीचा कहर! पारा थेट ७ अंशांवर, सहा वर्षांतील नीचांकी तापमानाची नोंद

ताज्या बातम्या

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली
गुन्हे

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली

August 23, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बंद घर फोडून सोन्याचे दागिने लांबवले

August 23, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

रामानंदनगरात बंद घर फोडले; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबवली

August 22, 2026
अक्षरदीप बहिणाई
खान्देश

अक्षरदीप बहिणाई

August 22, 2026
जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक
गुन्हे

जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक

August 22, 2026
वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
जळगाव जिल्हा

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add