• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बालनाट्य लेखक ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या संहितांचे पुस्तक प्रकाशन

बालरंगभूमी परिषदतर्फे आयोजन : ज्येष्ठ अभिनेते पुष्कर श्रोत्री यांची उपस्थिती

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 8, 2025
in खान्देश, जळगाव जिल्हा, मनोरंजन
0
बालनाट्य लेखक ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या संहितांचे पुस्तक प्रकाशन

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरासह महाराष्ट्रातील विविध शहरात बालनाट्य चळवळ रुजवत ती बहरत ठेवण्याचे कार्य गेल्या ४८ वर्षांपासून करणारे रंगकर्मी, बालनाट्य लेखक – दिग्दर्शक ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या निवडक बालनाट्य संहितांचे प्रकाशन आज (दि.८) सायंकाळी ६ वाजता भैय्यासाहेब गंधे सभागृहात ज्येष्ठ अभिनेते पुष्कर श्रोत्री व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.

४५ हून अधिक बालनाट्य व १ दोन अंकी बालनाट्य लिहणाऱ्या ज्ञानेश्वर गायकवाड यांनी बालनाट्याच्या माध्यमातून बालकांचे भावविश्व फुलवण्याचे कार्य केले आहे. त्यांनी लिहिलेल्या बालनाट्यातून अभिनय साकारलेले बालकलावंत आज चित्रपट व व्यावसायिक रंगभूमीवर कार्यरत असून, त्यांचे लेखन अधिकाधिक बालनाट्य संस्था व दिग्दर्शकांपर्यंत पोहचण्यासाठी त्यांच्या निवडक संहितांचे प्रकाशन शहरातील श्रेयस प्रकाशनातर्फे करण्यात येत आहे.

भैय्यासाहेब गंधे सभागृहात सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक चित्रपट निर्माते पुष्कर श्रोत्री यांच्यासह माजी खा. डॉ.उल्हास पाटील, भूगर्भशास्त्रज्ञ संपदा जोशी आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. शहरातील रंगकर्मी, बालकलावंत, रसिक व पालकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती द्यावी, असे आवाहन आयोजक अंजली धारु, श्रेयस प्रकाशनच्या डॉ.श्रध्दा पाटील व बालरंगभूमी परिषदेचे पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांतर्फे करण्यात आले आहे.

Next Post
संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त मोटारसायकल रॅली!

संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त मोटारसायकल रॅली!

ताज्या बातम्या

स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी सातत्याची कास धरा; प्रमोद राणेराजपूत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
खान्देश

स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी सातत्याची कास धरा; प्रमोद राणेराजपूत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

October 8, 2026
मुक्ताईनगरात सेवासंकल्प अभियानातून रक्तदानाचा संकल्प; ३० रक्तदात्यांनी दिले योगदान
गुन्हे

मुक्ताईनगरात सेवासंकल्प अभियानातून रक्तदानाचा संकल्प; ३० रक्तदात्यांनी दिले योगदान

October 8, 2026
उपलब्ध चाऱ्याचे जतन, संवर्धन, पोषणमूल्यवर्धन व कार्यक्षम वापर गरजेचा : डॉ. प्रदीप झोड
खान्देश

उपलब्ध चाऱ्याचे जतन, संवर्धन, पोषणमूल्यवर्धन व कार्यक्षम वापर गरजेचा : डॉ. प्रदीप झोड

October 8, 2026
डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ, अंडर-१७ बॅडमिंटन संघ तालुकास्तरावर विजेता
क्रिडा

डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळ, अंडर-१७ बॅडमिंटन संघ तालुकास्तरावर विजेता

October 8, 2026
जागतिक सेरेब्रल पाल्सी दिनानिमित्त जनजागृती; मुलांच्या विशेष क्षमतांना प्रोत्साहन
आरोग्य

जागतिक सेरेब्रल पाल्सी दिनानिमित्त जनजागृती; मुलांच्या विशेष क्षमतांना प्रोत्साहन

October 8, 2026
अर्जुन पवार यांची लोकमान्य श्रमिक कामगार संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड
खान्देश

अर्जुन पवार यांची लोकमान्य श्रमिक कामगार संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड

October 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add