• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगावच्या निकिता पवारला लातूर येथे सुवर्णपदकासह ‘बेस्ट फायटर’ पुरस्कार

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 7, 2025
in क्रिडा, खान्देश, जळगाव जिल्हा
0
जळगावच्या निकिता पवारला लातूर येथे सुवर्णपदकासह ‘बेस्ट फायटर’ पुरस्कार

जळगाव, (प्रतिनिधी) : लातुर येथे ३५ व्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ पुरुष व महिला अजिंक्यपद स्पर्धा ५ ते ७ डिसेंबर दरम्यान पार पडली. यामध्ये जैन स्पोर्टस् अकॅडमी च्या निकिता दिलीप पवार ने सुवर्णपदक प्राप्त केले. या स्पर्धेत जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन तथा जैन स्पोर्टस् अकॅडमीची राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती निकिता दिलीप पवार हिने पुन्हा एकदा आपलं वर्चस्व प्रस्थापित करुन महिलांच्या ५७ किलो आतिल वजन गटात सुवर्णपदक पटकाविले. स्पर्धेत सर्वात्कृष्ट खेळाडू म्हणून बेस्ट फायटर पुरस्काराने तिला सन्मानित करण्यात आले.

या यशामुळे हैदराबाद येथे होणार असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघात तिचे स्थान निश्चित झाले आहे. तिने पहिल्या फेरीत ठाणे, दुसऱ्या फेरीत कोल्हापूर तर अंतिम फेरीत पुणे ची खेळाडू श्रद्धा वाल्हेकर हिला नमवत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. निकिता चे या वर्षांतील राज्य स्पर्धेतील लागोपाठ तिसरं सुवर्णपदक आहे, तर राष्ट्रीय स्पर्धेत एक सुवर्णपदक एक कांस्यपदक तिने पटकाविले. तिला प्रशिक्षक जयेश बाविस्कर, अजित घारगे यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले.

तिच्या या यशाबद्दल जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे अध्यक्ष तथा जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, उपाध्यक्ष ललित पाटील, खजिनदार सुरेश खैरनार, सचिव अजित घारगे, सहसचिव रविंद्र धर्माधिकारी, सदस्य नरेंद्र महाजन, कृष्णकुमार तायडे, महेश घारगे, सौरभ चौबे तसेच जैन स्पोर्टस् अकॅडमीचे अरविंद देशपांडे यांनी कौतुक केले आहे.


 

Tags: #jalgaon_city#sports
Next Post
मोटारसायकल चोराला अटक! स्थानिक गुन्हे शाखेने उघड केले ०४ चोरीचे गुन्हे

मोटारसायकल चोराला अटक! स्थानिक गुन्हे शाखेने उघड केले ०४ चोरीचे गुन्हे

ताज्या बातम्या

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली
गुन्हे

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली

August 23, 2026
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी
गुन्हे

बंद घर फोडून सोन्याचे दागिने लांबवले

August 23, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

रामानंदनगरात बंद घर फोडले; सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लांबवली

August 22, 2026
अक्षरदीप बहिणाई
खान्देश

अक्षरदीप बहिणाई

August 22, 2026
जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक
गुन्हे

जळगावच्या महफिल रेस्टो बारला पहाटे आग; एसी, वायरिंगसह फर्निचर जळून खाक

August 22, 2026
वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या
जळगाव जिल्हा

वाहून जाणारा पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा; जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप द्या

August 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add