• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

वाळूमाफियांना रोखणाऱ्या तलाठ्याच्या कानशिलात लगावली, ‘टॉमी’ने हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न!

तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
December 2, 2025
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
वाळूमाफियांना रोखणाऱ्या तलाठ्याच्या कानशिलात लगावली, ‘टॉमी’ने हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न!

जळगाव, (प्रतिनिधी) : विना परवाना वाळूची अवैधरित्या वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांच्यावर वाळू माफियांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वाळू माफियांनी तलाठ्याची कॉलर पकडून त्यांच्या कानशिलात लगावली, शिवीगाळ केली आणि ‘टॉमी’ (दांडक्यासारखे शस्त्र) ने त्यांच्यावर हल्ला करत जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला.

ही घटना सोमवार, दि. १ रोजी दुपारी साडेतीन वाजता खंडेराव नगरात घडली. ​पिंप्राळ्याचे ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) राजू कडू बाऱ्हे (वय ५३) यांनी वाळूमाफिया मनोज रमेश भालेराव, फैजल खान आणि ट्रॅक्टर चालक यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली असून तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

​तलाठी राजू बाऱ्हे हे खंडेराव नगराकडून त्यांच्या कार्यालयाकडे जात असताना गणपती मंदिराजवळून एका विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरमधून वाळूचा अवैध उपसा होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ ट्रॅक्टर थांबवून चालकाकडे वाळू वाहतुकीच्या परवान्याबाबत विचारणा केली.

​याच वेळी, यापूर्वी वाळू वाहतुकीची कारवाई झालेला आणि ट्रॅक्टर मालक असलेला मनोज भालेराव हा त्याचा मित्र फैजलसोबत दुचाकीवरून तेथे आला. त्याने तलाठी बाऱ्हे यांना दम दिला आणि “हे ट्रॅक्टर माझेच असून तुमचे नेहमीचेच झाले आहे,” असे म्हणत ट्रॅक्टर घेऊन जाण्यास सांगितले.
​
तलाठी बाऱ्हे यांनी ट्रॅक्टरला अडवून कारवाई करण्याचा प्रयत्न केला असता, मनोज भालेराव याने त्यांच्या अंगावर धावून जात त्यांची कॉलर पकडली आणि त्यांच्या कानशिलात लगावली. तसेच, त्यांना ढकलून देत शिवीगाळ केली. ​मारहाण केल्यानंतर भालेराव याने त्याच वेळी “तुला मारुन टाकायला पाहिजे होते” असे म्हणत फैजल खान याला ‘टॉमी’ (शस्त्र) ने मारण्यास सांगितले. त्यानुसार फैजलने बाऱ्हे यांच्यावर टॉमीने हल्ला केला. सुदैवाने बाऱ्हे बाजूला सरकल्याने ते बचावले, मात्र याच संधीचा फायदा घेऊन चालक ट्रॅक्टर घेऊन पसार झाला.

​यानंतर तलाठी बाऱ्हे यांनी सहकाऱ्यांना फोन केला. नागरिकांची गर्दी जमा होत असल्याचे पाहून वाळू माफियांनी घटनास्थळावरून पळ काढला. या गंभीर घटनेमुळे महसूल कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ग्राम महसूल अधिकारी बाऱ्हे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
​

Tags: CrimeJalgaonPolice
Next Post
अमूर्त शैलीतील ‘ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शन जळगावात!

अमूर्त शैलीतील ‘ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शन जळगावात!

ताज्या बातम्या

रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रत्येक दात्याला हेल्मेटचे वाटप!
खान्देश

रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रत्येक दात्याला हेल्मेटचे वाटप!

December 2, 2025
यावल नगर परिषद निवडणूक: मतदानासाठी महिलांचा ‘विक्रमी’ उत्साह!
खान्देश

यावल नगर परिषद निवडणूक: मतदानासाठी महिलांचा ‘विक्रमी’ उत्साह!

December 2, 2025
अमूर्त शैलीतील ‘ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शन जळगावात!
खान्देश

अमूर्त शैलीतील ‘ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शन जळगावात!

December 2, 2025
वाळूमाफियांना रोखणाऱ्या तलाठ्याच्या कानशिलात लगावली, ‘टॉमी’ने हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न!
खान्देश

वाळूमाफियांना रोखणाऱ्या तलाठ्याच्या कानशिलात लगावली, ‘टॉमी’ने हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न!

December 2, 2025
शिवनेरी ग्रुपतर्फे रक्तदान शिबिर आणि कीर्तन सोहळ्याचे आयोजन
जळगाव जिल्हा

शिवनेरी ग्रुपतर्फे रक्तदान शिबिर आणि कीर्तन सोहळ्याचे आयोजन

December 1, 2025
कामगारांना मतदानासाठी ‘भरपगारी सुट्टी’ अनिवार्य: आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई होणार!
खान्देश

कामगारांना मतदानासाठी ‘भरपगारी सुट्टी’ अनिवार्य: आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई होणार!

December 1, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group