• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बॅग लिफ्टिंगचे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात; ८ लाख रुपयांची रोकड जप्त

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 27, 2025
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
बॅग लिफ्टिंगचे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात; ८ लाख रुपयांची रोकड जप्त

​जळगाव, (प्रतिनिधी) : येथील एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या बॅग लिफ्टिंगच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला असून, ८ लाख रुपये रोख रक्कम हस्तगत केली आहे. दि.१५ नोव्हेंबर रोजी विलास मधुकर जाधव (वय ६७) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपास करण्याचे आदेश दिले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास करून २३ नोव्हेंबर रोजी विजय शांताराम पाटील (वय ४१, रा. कलावसंत नगर, जळगाव), जितेंद्र छोटुलाल जाधव (वय ४४, रा. ज्ञानदेव नगर, जळगाव) या दोन आरोपींना ताब्यात घेतले. ​त्यांच्याकडून हिसकावून नेलेली आठ लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
​ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोउपनि. शरद बागल, सोपान गोरे, पोहेकॉ प्रविण भालेराव, मुरलीधर धनगर, सलीम तडवी, सिध्देश्वर डापकर, रतनहरी गिते, मयुर निकम, सचिन घुगे, प्रदीप सपकाळे, पंकज खडसे, मुबारक देशमुख, कुंदनसिंग बयास गौरव पाटील, मिलींद जाधव तसेच स्थागुशा, नेत्रम आणि सायबर शाखेच्या अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने केली.

Tags: CrimeJalgaonPolice
Next Post
जळगाव जिल्हा परिषदेतर्फे आंतरजातीय विवाह प्रोत्साहन अनुदान २०४ जोडप्यांना वाटप

जळगाव जिल्हा परिषदेतर्फे आंतरजातीय विवाह प्रोत्साहन अनुदान २०४ जोडप्यांना वाटप

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा परिषदेतर्फे आंतरजातीय विवाह प्रोत्साहन अनुदान २०४ जोडप्यांना वाटप
खान्देश

जळगाव जिल्हा परिषदेतर्फे आंतरजातीय विवाह प्रोत्साहन अनुदान २०४ जोडप्यांना वाटप

November 27, 2025
बॅग लिफ्टिंगचे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात; ८ लाख रुपयांची रोकड जप्त
खान्देश

बॅग लिफ्टिंगचे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात; ८ लाख रुपयांची रोकड जप्त

November 27, 2025
जळगाव विमानतळ विस्ताराला गती; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला भूसंपादन प्रक्रियेचा सविस्तर आढावा
जळगाव जिल्हा

जळगाव विमानतळ विस्ताराला गती; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला भूसंपादन प्रक्रियेचा सविस्तर आढावा

November 27, 2025
एरंडोलचा सर्वांगीण विकास साधला’ – आ. अमोल पाटील
खान्देश

एरंडोलचा सर्वांगीण विकास साधला’ – आ. अमोल पाटील

November 27, 2025
धरणगाव पंचायत समितीचे आरोग्य सेवक मिलिंद लोणारी यांना आंतरराष्ट्रीय ‘कर्मवीर चक्र’ पुरस्कार!
आरोग्य

धरणगाव पंचायत समितीचे आरोग्य सेवक मिलिंद लोणारी यांना आंतरराष्ट्रीय ‘कर्मवीर चक्र’ पुरस्कार!

November 27, 2025
‘धूम स्टाईल’ चोरीचा फियास्को! गळ्यातून ओढली, पण पोत निघाली बेन्टेक्सची
खान्देश

‘धूम स्टाईल’ चोरीचा फियास्को! गळ्यातून ओढली, पण पोत निघाली बेन्टेक्सची

November 26, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group