• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

निवडणूक विषयक कामकाजाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

मतदान केंद्रांवर आवश्यक मुलभुत सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 24, 2025
in जळगाव जिल्हा
0
निवडणूक विषयक कामकाजाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) : नगरपालिका, नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक मतदानाच्या दिवशी सर्व नगरपालिका क्षेत्रातील मतदान केंद्रांवर मतदारांना आवश्यक असलेल्या मुलभुत सोई-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, उपविभागीय अधिकारी विनय गोसावी, सह आयुक्त नगरपालिका प्रशासन जर्नादन पवार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक श्री भुकन प्रत्यक्ष उपस्थित होते तर दूरदृश्य प्रणालीव्दारे सर्व नगरपरिषदांचे निवडणूक निर्णय अधिकारी, सर्व नगरपालिका मुख्याधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री.घुगे पुढे म्हणाले, मतदान केंद्रांवर पिण्यासाठी पाणी, स्वच्छता गृह, दिव्यांग मतदारांसाठी व्हील चेअरची सुविधा आदि आवश्यक सोई-सुविधा मतदानाच्या दिवशी उपलब्ध करुन दयाव्यात, आदर्श आचार संहितेचे विविध पथकांमार्फत प्रभावीपणे अंमलबजावणी होणे आवश्यक असून त्यासाठी जीओ टॅग लोकेशन कार्यान्वीत करण्यात यावेत, तसेच नगरपालिका क्षेत्रात संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्र असणाऱ्या भागात पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात यावा, एक खिडकी कक्ष पुरेशा मणुष्यबळासह कार्यान्वीत ठेवणे तसेच स्थानिक स्तरावरील मिडीया कक्षमार्फत निवडणूक विषयक माहिती पत्रकारांना वेळोवेळी देण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.

स्वीप कार्यक्रमातंर्गत मतदार जागृतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे, निवडणूक कामात सहभागी असलेल्या कर्मचा-यांचे प्रशिक्षण घेऊन त्यांना माहिती देणे, यावेळी जिल्हाधिकारी यांनी टपाली मतपत्रिका, मतपत्रिका छपाई, स्ट्रॉग रुम, EVM Setting व Sealing, मतदान यंत्रे CU व BU. FLC तसेच इतर मतदान साहित्य, कायदा व सुव्यवस्था, आठवडे बाजार बंद, क्षेत्रिय अधिकारी यांना कार्यकारी दंडाधिकारी यांचे अधिकारी प्रदान करणे, शस्त्र जमा करण्याबाबत, विविध परवानगी विषयक कक्ष व परवानगी देणे, मतदार जनजागृती, दारुबंदीची अंमलबजावणी करणे, निवडणक खर्च व स्टार प्रचारक, मतमोजणी (मतमोजणी नियोजन, प्रशिक्षण), वाहतूक आराखडा नियोजन या विषयांचा आढावा त्यांनी घेतला.

Tags: ElectionJalgaon
Next Post
जळगाव येथे ६४ व्या हौशी मराठी राज्य नाटय स्पर्धेला आजपासून सुरुवात

जळगाव येथे ६४ व्या हौशी मराठी राज्य नाटय स्पर्धेला आजपासून सुरुवात

ताज्या बातम्या

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या
जळगाव जिल्हा

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 26, 2026
रावेर पोलिसांची मोठी कारवाई; बुऱ्हाणपूरच्या व्यापाऱ्याला लुटणारे ७ संशयित जेरबंद!
गुन्हे

रावेर पोलिसांची मोठी कारवाई; बुऱ्हाणपूरच्या व्यापाऱ्याला लुटणारे ७ संशयित जेरबंद!

February 25, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group