आ.अमोल पाटलांच्या उपस्थितीत डॉ. नरेंद्र ठाकूर यांच्यासह उमेदवारांसाठी जोरदार शक्तिप्रदर्शन
एरंडोल, (प्रतिनिधी) : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एरंडोल शहरात भाजप-सेना युतीच्या प्रचाराने शनिवारी गती घेतली. एरंडोल-पारोळा तालुक्याचे आमदार अमोलदादा चिमणराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. नरेंद्र ठाकूर यांच्यासह प्रभाग क्र. ९ व प्रभाग क्र. १० मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. या शक्तिप्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
रॅली आणि प्रचार कार्यालयाचे उद्घाटन..
या भव्य प्रचार रॅलीमध्ये नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. नरेंद्र ठाकूर यांच्यासोबतच प्रभाग क्र. ९ चे उमेदवार नितेश कैलाश चोधरी आणि जिजाबाई वसंत पाटील, तसेच प्रभाग क्र. १० चे उमेदवार मनकार्नाबाई चैत्राम चोधरी आणि नोएम खॉं दलशेरखॉ सहभागी झाले होते. आमदार अमोलदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या या रॅलीमुळे एरंडोलमधील वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले.
त्याचप्रमाणे, निवडणूक प्रचाराला अधिक बळ देण्यासाठी प्रभाग क्र. ११ आणि प्रभाग क्र. ७ मधील प्रचार कार्यालयांचे उद्घाटनही याच दिवशी संपन्न झाले. याप्रसंगी आमदार अमोलदादा पाटील यांनी बोलताना युतीच्या उमेदवारांना मतदार राजाने संधी दिल्यास, नक्कीच शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त केला. या रॅलीमुळे एरंडोलमधील युतीच्या बाजूने जोरदार वातावरण निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती..
या महत्वपूर्ण प्रचार दौऱ्याला भाजपचे ज्येष्ठ नेते आणि असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यामध्ये प्रामुख्याने किशोर काळकर, रमेश परदेशी, रवींद्र महाजन, मनोज पाटील, अशोक चौधरी, संजू साळी, आर्शिवाद पाटील, राजुआबा चौधरी, बबलू चौधरी, किशोर चौधरी, प्रकाश ठाकूर, चंदू जोहरी, गुड्डू जोहरी, दशरथ चौधरी, सुनील चौधरी, मालती अमोल वाणी, संजय सुरेश पाटील, मंजुळाबाई नत्थू चौधरी, धनंजय खैरनार, अतुल मराठे यांचा समावेश होता. या सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी युतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.








