• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

ऑनलाईन टास्कच्या नावाखाली साडेतीन लाखांची फसवणूक!

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 8, 2025
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
ऑनलाईन टास्कच्या नावाखाली साडेतीन लाखांची फसवणूक!

जळगाव, (प्रतिनिधी) : ऑनलाईन कामाच्या माध्यमातून झटपट पैसे कमविण्याचे आमिष दाखवून शहरातील एका नागरिकाची तब्बल ₹३ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी ६ नोव्हेंबर, गुरुवारी अज्ञातांविरुद्ध शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?
ज्ञानदेवनगर येथील रहिवासी आणि एका महाविद्यालयात लिपिक म्हणून कार्यरत असलेले रमेश सोनार (वय ४५) यांना ५ ऑक्टोबर रोजी ‘टेलिग्राम’ ॲपवर एक संदेश आला. व्हिडिओ आणि फोटो लाईक करण्याच्या टास्कसाठी प्रत्येक लाईकवर ₹१०० मिळतील, असे त्यात नमूद केले होते. सोनार यांनी सुरुवातीचे काम पूर्ण केले असता, त्यांना ₹६६० मिळाले. यामुळे त्यांचा विश्वास बसला.

यानंतर त्यांना बीटकॉईन आणि क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करून मोठा नफा मिळवण्याचा ‘इकॉनॉमी टास्क’ पूर्ण करण्यास सांगण्यात आले. यातही त्यांना काही प्रमाणात नफा झाल्याचा संदेश आल्याने त्यांना हा व्यवहार खरा वाटला. मोठ्या नफ्याच्या आमिषाने सोनार यांना मोठी गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करण्यात आले. ₹२८ हजार भरल्यास ₹४२ हजार मिळतील असे सांगण्यात आले.

क्रेडिट कार्डचा वापर, लाखोंचा तोटा..
सोनार यांनी या आमिषाला बळी पडून विविध तारखांना त्यांच्या बँकांच्या क्रेडिट कार्ड्सचा वापर करून विविध बँक खात्यांमध्ये एकूण ₹३ लाख ६० हजार रुपये हस्तांतरित केले. ८ ऑक्टोबर रोजी त्यांनी जेव्हा आपले ‘मिन्ट’ खाते तपासले, तेव्हा पैसे वाढण्याऐवजी त्यांना उलट तोटा दिसत होता.

याबाबत विचारणा केली असता, ‘डेटा रिपेअर’ करण्यासाठी आणखी रुपये भरावे लागतील, असे सांगण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रमेश सोनार यांनी तातडीने शनिपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. पोलीस या अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत.

 

नागरिकांना आवाहन: ऑनलाईन टास्क किंवा कमी वेळेत मोठा परतावा देणाऱ्या कोणत्याही अज्ञात आणि संशयास्पद गुंतवणुकीच्या आमिषाला बळी पडू नका. फसवणूक झाल्यास त्वरित सायबर पोलीस स्टेशन किंवा नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करा.

 


Tags: #jalgaon #maharashtraCrimefraudPolice

ताज्या बातम्या

ऑनलाईन टास्कच्या नावाखाली साडेतीन लाखांची फसवणूक!
खान्देश

ऑनलाईन टास्कच्या नावाखाली साडेतीन लाखांची फसवणूक!

November 8, 2025
जळगावला राज्यात सर्वाधिक थंडीचा तडाखा! दोन दिवसांत पारा थेट ९ अंशांनी घसरला
खान्देश

जळगावला राज्यात सर्वाधिक थंडीचा तडाखा! दोन दिवसांत पारा थेट ९ अंशांनी घसरला

November 8, 2025
जळगाव पोलिसांची ‘ऑल आऊट’ धडक मोहीम
खान्देश

जळगाव पोलिसांची ‘ऑल आऊट’ धडक मोहीम

November 7, 2025
कुंटणखाण्यावर पोलिसांची धाड, ५ तरुणींची सुटका; ग्राहकांसह मालकांवर गुन्हा दाखल!
खान्देश

कुंटणखाण्यावर पोलिसांची धाड, ५ तरुणींची सुटका; ग्राहकांसह मालकांवर गुन्हा दाखल!

November 7, 2025
१३३ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर
जळगाव जिल्हा

१३३ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर

November 6, 2025
जळगावच्या रंगभूमीच्या विकासासाठी सदैव मदत करणार – आ. राजूमामा भोळे
खान्देश

जळगावच्या रंगभूमीच्या विकासासाठी सदैव मदत करणार – आ. राजूमामा भोळे

November 6, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group