• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगावात गोळीबार: एकाचा मृत्यू, दोन जखमी; हद्दपार आरोपीकडून गोळीबार

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 10, 2025
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
जळगावात गोळीबार: एकाचा मृत्यू, दोन जखमी; हद्दपार आरोपीकडून गोळीबार

जळगाव, (प्रतिनिधी) : जुन्या वादातून सुरू असलेल्या वादाचे रूपांतर थेट गोळीबारात झाले आणि कांचन नगर परिसर हादरला. रविवारी दि.९ रोजी रात्री १०.३० वाजता घडलेल्या या घटनेत आकाश युवराज बाविस्कर उर्फ ‘टपऱ्या’ याचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अन्य दोन जण जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे, गोळीबार करणारा मुख्य आरोपी आकाश सपकाळे हा हद्दपार केलेला असतानाही त्याने शहरात येऊन ही घटना घडवली असून, तो सध्या पसार झाला आहे.

नेमकी घटना काय?
हद्दपार केलेला आरोपी आकाश सपकाळे उर्फ डोया आणि सागर सपकाळे यांच्यात जुना वाद होता. रविवारी संध्याकाळपासूनच परिसरात या वादातून धुसफूस सुरू होती. रात्री हा वाद विकोपाला गेला. रात्री १०.३० च्या सुमारास आकाश सपकाळे याने सागर सपकाळे यांच्या घरासमोर येऊन थेट गोळीबार केला.

या गोळीबारात सागर सपकाळे यांचे भाचे गणेश सोनवणे यांच्या हाताला, तर तुषार रामचंद्र सोनवणे यांच्या कानाला गोळी लागून ते जखमी झाले. याव्यतिरिक्त, आकाश युवराज बाविस्कर उर्फ टपऱ्या याच्या छातीत गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला.

गोळीबारातील सर्व जखमींना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असतानाच आकाश बाविस्कर (टपऱ्या) याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर रुग्णालयात आणि घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गनापुरे, तसेच शनिपेठ पोलिस ठाण्याच्या निरीक्षक कावेरी कमलापूरकर यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला आहे. हद्दपारीचे उल्लंघन करून जळगावात येऊन गोळीबार करणारा आरोपी आकाश सपकाळे याच्या अटकेसाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.

Tags: CrimeJalgaonmurderPolice
Next Post
गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या नॅशनल गांधीयन लीडरशिप शिबिराचा समारोप

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या नॅशनल गांधीयन लीडरशिप शिबिराचा समारोप

ताज्या बातम्या

जळगाव महापालिकेच्या ७ स्वीकृत नगरसेवकांची बिनविरोध निवड; भाजपचे पारडे जड
जळगाव जिल्हा

जळगाव महापालिकेच्या ७ स्वीकृत नगरसेवकांची बिनविरोध निवड; भाजपचे पारडे जड

April 15, 2026
गावठी कट्टा व कोयत्यासह दोघांना ठोकल्या बेड्या; एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई
गुन्हे

गावठी कट्टा व कोयत्यासह दोघांना ठोकल्या बेड्या; एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई

April 15, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 15, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’; ७५० कोटींच्या कर्ज वितरणासह सक्षमीकरणाचा टप्पा पार
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’; ७५० कोटींच्या कर्ज वितरणासह सक्षमीकरणाचा टप्पा पार

April 15, 2026
शोषितांचा आवाज बुलंद करणाऱ्या महामानवाला गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे मानवंदना
जळगाव जिल्हा

शोषितांचा आवाज बुलंद करणाऱ्या महामानवाला गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे मानवंदना

April 14, 2026
महापालिकेचा विद्युत विभाग ‘निद्रावस्थेत’; दिवसा दिवे सुरू तर रात्री अंधार!
जळगाव जिल्हा

महापालिकेचा विद्युत विभाग ‘निद्रावस्थेत’; दिवसा दिवे सुरू तर रात्री अंधार!

April 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group