• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

४८ तासांत २५ लाखांच्या लुटीचा छडा: ‘ड्रायव्हर’च निघाला ‘मास्टरमाईंड’!

जळगाव एलसीबीची मोठी कारवाई; सहा आरोपी अटकेत

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
October 31, 2025
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
४८ तासांत २५ लाखांच्या लुटीचा छडा: ‘ड्रायव्हर’च निघाला ‘मास्टरमाईंड’!

जळगाव, (प्रतिनिधी) : भुसावळ तालुका पोलीस स्टेशन हद्दीत गाजलेल्या ₹२५.४२ लाख रुपयांच्या सनसनाटी लुटीचा छडा लावण्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला अवघ्या ४८ तासांत यश आले आहे. या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार फिर्यादी ज्या ‘रॉयल कंपनीत’ नोकरी करतात, त्याच कंपनीचा चालक शाहीद बेग असल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपी शाहीद बेगसह एकूण सहा (०६) आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून लुटीच्या रकमेपैकी ₹२३,४२,०००/- रोख आणि तीन मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत.

गुन्ह्याची पार्श्वभूमी:
दि.२८ रोजी रात्री सुमारे १०:२० वाजता फिर्यादी मोहम्मद यासीन ईस्माइल हे त्यांच्या कार्यालयातील ₹२५,४२,०००/- असलेली पैशांची बॅग मोटारसायकलवरून घेऊन घरी जात होते. मौजे खडके शिवारातील सत्यसाई नगरकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर, तीन अनोळखी इसमांनी त्यांच्या चालत्या मोटारसायकलला धक्का दिला आणि त्यांचा तोल गेल्यावर पेट्रोल टाकीवर ठेवलेली पैशांची बॅग बळजबरीने हिसकावून पोबारा केला होता.

ड्रायव्हरनेच दिली ‘टीप’!
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तपासात फिर्यादीचा चालक शाहीद बेग याच्यावर संशय बळावला. कसून चौकशी केल्यावर शाहीद बेगने गुन्ह्याचा कट रचल्याची कबुली दिली. शाहीद बेग हा फिर्यादीच्याच कंपनीत ड्रायव्हर असल्याने, त्याला पैसे ने-आण करण्याच्या वेळेची माहिती होती. त्यानेच अकाऊंटंट असलेले फिर्यादी यासीन शेख यांच्याकडे पैसे असल्याची ‘टीप’ त्याचे साथीदार मुजाहीद मलीक आणि मोहम्मद दानिश यांना दिली.

मुजाहीदने हा प्लॅन रावेर तालुक्यातील रसलपूर येथील अजहर फरीद मलक, अमीर खान यूनुस खान आणि इजहार बेग इरफान बेग यांना सांगितला. या तिघांनी घटनेच्या रात्री प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन लुटीचा गुन्हा केला. तपासात आरोपींनी संगनमत करून कट रचून दरोडा टाकल्याचे निष्पन्न झाल्याने, गुन्ह्यात दरोड्याचे वाढीव कलम लावण्यात आले आहे.

पोलिसांनी दि. ३१ रोजी सर्व ०६ आरोपींना अटक केली आहे. अटकेतील आरोपींमध्ये शाहीद बेग इब्राहिम वेग (२५, रा. भुसावळ) – (मुख्य सूत्रधार), मुजाहिद आसीफ मलौक (२०, रा. भुसावळ), मोहम्मद दानिश मोहम्मद हाशीम (१९, रा. भुसावळ), अजहर फरीद मलक (२४, रा. रसलपूर, ता. रावेर), अमीर खान युनुस खान (२४, रा. रसलपूर, ता. रावेर), ईजहार बेग इरफान बेग (२३, रा. रसलपूर, ता. रावेर) यांचा समावेश आहे. आरोपींपैकी शाहीद बेग आणि अमीर खान यांच्यावर यापूर्वीही चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.

आरोपींकडून लुटीच्या रकमेपैकी ₹२३,४२,०००/- जप्त करण्यात आले असून, उर्वरित ₹२ लाख आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करायची आहे. सखोल तपासासाठी न्यायालयाने सर्व आरोपींना दि.०३ नोव्हेंबर रोजी पावेतो पोलीस कोठडी सुनावली आहे. सदरची कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड (स्था.गु.शा.), पोलीस निरीक्षक राहुल वाघ, पोलीस निरीक्षक महेश गायकवाड (भुसावळ तालुका पो.स्टे.) आणि त्यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी पार पाडली.

 


 

Tags: #jalgaon #maharashtraBhusawalCrimePolice
Next Post
चाळीसगाव पालिका निवडणुकीसाठी भाजपची जोरदार तयारी

चाळीसगाव पालिका निवडणुकीसाठी भाजपची जोरदार तयारी

ताज्या बातम्या

जिद्द आणि संघर्षातून शिक्षणाची नवी ओढ; संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘गुरुजी’ चित्रपटाचे विशेष प्रदर्शन
खान्देश

जिद्द आणि संघर्षातून शिक्षणाची नवी ओढ; संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘गुरुजी’ चित्रपटाचे विशेष प्रदर्शन

January 30, 2026
विज्ञानाचा अविष्कार: महाविद्यालयात रंगले ‘इस्रो’च्या उपग्रहांचे पोस्टर प्रदर्शन!
जळगाव जिल्हा

विज्ञानाचा अविष्कार: महाविद्यालयात रंगले ‘इस्रो’च्या उपग्रहांचे पोस्टर प्रदर्शन!

January 30, 2026
जळगाव जिल्ह्यात १० वी, १२ वीच्या परीक्षेवर ‘ड्रोन’ची नजर; कॉपीबहाद्दरांवर थेट फौजदारी कारवाई!
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात १० वी, १२ वीच्या परीक्षेवर ‘ड्रोन’ची नजर; कॉपीबहाद्दरांवर थेट फौजदारी कारवाई!

January 30, 2026
रामराज्याच्या संकल्पनेसाठी जळगावमध्ये १ फेब्रुवारीला ‘हिंदु राष्ट्र जागृती सभा’!
खान्देश

रामराज्याच्या संकल्पनेसाठी जळगावमध्ये १ फेब्रुवारीला ‘हिंदु राष्ट्र जागृती सभा’!

January 29, 2026
नाईट फुटबॉल स्पर्धेत जैन इरिगेशनचे निर्भेळ यश; अंतिम सामन्यात जालन्याचा पराभव
क्रिडा

नाईट फुटबॉल स्पर्धेत जैन इरिगेशनचे निर्भेळ यश; अंतिम सामन्यात जालन्याचा पराभव

January 28, 2026
पावसाच्या व्यत्ययानंतरही जळगावकरांची ‘खाऊ गल्ली’वर गर्दी; बहिणाबाई महोत्सवाचा असा झाला समारोप!
जळगाव जिल्हा

पावसाच्या व्यत्ययानंतरही जळगावकरांची ‘खाऊ गल्ली’वर गर्दी; बहिणाबाई महोत्सवाचा असा झाला समारोप!

January 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group