• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बिल पास करण्यासाठी अधिकाऱ्याने मागितली लाच ! एसीबीने रंगेहात पकडले; गुन्हा दाखल

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
October 16, 2025
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
बिल पास करण्यासाठी अधिकाऱ्याने मागितली लाच ! एसीबीने रंगेहात पकडले; गुन्हा दाखल

जळगाव, (प्रतिनिधी) : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत केलेल्या कामाचे बिल पास करण्यासाठी ७,०००/- रुपयांची मागणी करून तडजोडीअंती ४,०००/- रुपयांची लाच स्वीकारताना ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग, अमळनेर येथील वर्ग-१ अधिकारी दिलीप दत्तात्रय पाटील यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी), जळगावच्या पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदयान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार हे खाजगी ठेकेदार असून त्यांनी स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत मौजे व मजरे हिंगोणे, ता. चोपडा येथे सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाचे ३,५५,०००/- रुपयांचे काम पूर्ण केले होते. या कामाचा अहवाल बनवून देण्याच्या मोबदल्यात उपविभागीय अधिकारी दिलीप पाटील यांनी १३ ऑक्टोबर रोजी तक्रारदाराकडे एकूण बिलाच्या २ टक्के, म्हणजे ७,०००/- रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी १५ ऑक्टोबर रोजी ला.प्र.वि. जळगाव यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली.

तक्रारीच्या अनुषंगाने पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. यावेळी आरोपी दिलीप पाटील यांनी बिलाच्या २ टक्के, (७००० रूपये) लाचेची मागणी करून तडजोडीअंती ४,०००/- रुपये लाच स्वीकारण्यास सहमती दर्शविली.
त्यानुसार, १५ ऑक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा कारवाई केली. या कारवाईदरम्यान आरोपी लोकसेवक दिलीप पाटील यांनी तक्रारदाराकडून ४,०००/- रुपये लाच रक्कम त्यांच्या अहवालाचे काम करून देण्याच्या मोबदल्यात स्वतःसाठी ‘बक्षीस’ म्हणून स्वीकारली. लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले.

आरोपी दिलीप दत्तात्रय पाटील हे ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग, अमळनेर (विभाग महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरण, वर्ग-०१) येथे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याविरुद्ध अमळनेर पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या सापळा कारवाई त पर्यवेक्षण अधिकारी पोलिस उप अधिक्षक योगेश ठाकूर, सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक रेश्मा अवतारे, सफौ. विलास पाटील, पोहेकों. नरेंद्र पाटील, पोना. हेमंतकुमार महाले (ला.प्र.वि. नंदुरबार) आणि पोकों. राकेश दुसाने (ला.प्र.वि. जळगांव) यांनी सहभाग घेतला.


 

Tags: #curption#jalgaon #maharashtraCrime
Next Post
सुरक्षित दिवाळीसाठी जळगाव पोलीस दलाचे जाहीर आवाहन; ‘सुरक्षितता’ व ‘सावधानता’ जपा!

सुरक्षित दिवाळीसाठी जळगाव पोलीस दलाचे जाहीर आवाहन; 'सुरक्षितता' व 'सावधानता' जपा!

ताज्या बातम्या

कर्मचाऱ्यांनी दबावाखाली न येता प्रामाणिकपणे काम करावे; उपमहापौर मनोज चौधरी यांचे आवाहन
जळगाव जिल्हा

कर्मचाऱ्यांनी दबावाखाली न येता प्रामाणिकपणे काम करावे; उपमहापौर मनोज चौधरी यांचे आवाहन

March 16, 2026
मालेगावचे दुचाकी चोरटे जळगावात गजाआड; जिल्हापेठ पोलिसांची कारवाई
गुन्हे

मालेगावचे दुचाकी चोरटे जळगावात गजाआड; जिल्हापेठ पोलिसांची कारवाई

March 16, 2026
जळगाव महापालिकेत कर्मचाऱ्यांसाठी पहिल्यांदाच ‘जनता दरबार’
जळगाव जिल्हा

जळगाव महापालिकेत कर्मचाऱ्यांसाठी पहिल्यांदाच ‘जनता दरबार’

March 15, 2026
नातेवाईकाने गुंगीचे पेय देऊन महिलेवर केला अत्याचार; एकाला बेड्या
गुन्हे

नातेवाईकाने गुंगीचे पेय देऊन महिलेवर केला अत्याचार; एकाला बेड्या

March 15, 2026
पोलीस ठाण्यातच राडा; माजी नगरसेवक सोनवणे आणि ठाकरे गटात तुंबळ हाणामारी
गुन्हे

पोलीस ठाण्यातच राडा; माजी नगरसेवक सोनवणे आणि ठाकरे गटात तुंबळ हाणामारी

March 15, 2026
प्रकाश तेली यांच्या ‘शाश्वत विचार’ ग्रंथाचे पद्मश्री चैत्राम पवार यांच्या हस्ते प्रकाशन
जळगाव जिल्हा

प्रकाश तेली यांच्या ‘शाश्वत विचार’ ग्रंथाचे पद्मश्री चैत्राम पवार यांच्या हस्ते प्रकाशन

March 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group