• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई!.. पेट्रोल पंप दरोड्याचा पर्दाफाश; सहा आरोपी जेरबंद, मुद्देमाल जप्त

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
October 16, 2025
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई!.. पेट्रोल पंप दरोड्याचा पर्दाफाश; सहा आरोपी जेरबंद, मुद्देमाल जप्त

जळगाव, (प्रतिनिधी) : स्थानिक गुन्हे शाखेने मुक्ताईनगर आणि वरणगाव (ता. भुसावळ) येथील तीन पेट्रोल पंपांवर झालेल्या सशस्त्र दरोड्याचा गुन्हा अवघ्या चार दिवसांत उघडकीस आणला आहे. याप्रकरणी पाच आरोपी आणि एका विधी संघर्षित बालकाला अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तीन गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि रोकडसह एकूण ४०,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दि. ०९ ऑक्टोबर रोजी रात्री १० ते ११ वाजेच्या दरम्यान, पाच ते सहा अनोळखी इसमांनी मोटारसायकलवरून येत मुक्ताईनगर येथील बोदवड चौफुलीवरील ‘रक्षा टोफ्युअल’ (भारत पेट्रोलियम), कर्की फाटा येथील ‘मनुभाई आशिर्वाद पेट्रोलपंप’, आणि वरणगाव शिवारातील तळवेल फाटा (ता. भुसावळ) येथील ‘सय्यद पेट्रोलपंप’ या ठिकाणी बंदुकीचा धाक दाखवून सशस्त्र दरोडा टाकला होता. यामध्ये रोख रक्कम, मोबाईल फोन आणि सीसीटीव्ही डीव्हीआर असा एकूण १,३३,५००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जबरीने चोरून नेण्यात आला होता. या घटनेनंतर मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन आरोपींचा शोध घेण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना दिले. राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पाच तपास पथके तयार करण्यात आली. या पथकांनी रात्रंदिवस मेहनत घेत तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचा मुक्ताईनगर ते थेट नाशिक आणि अकोल्यापर्यंत माग काढला. अवघ्या चार दिवसांच्या अथक परिश्रमानंतर, नाशिक येथून चार आरोपींना आणि अकोला येथून एक आरोपी व एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले. पुढील तपासासाठी त्यांना मुक्ताईनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

अटक आरोपी आणि जप्त मुद्देमाल..
याप्रकरणी खालील आरोपींना अटक करण्यात आली आहे:
सचिन अरविंद भालेराव (वय ३५, रा. भुसावळ, ह.मु. खकनार, जि. बऱ्हाणपूर – मध्य प्रदेश), पंकज मोहन गायकवाड (वय २३, रा. भुसावळ, जि. जळगाव), हर्षल अनिल बावस्कर (वय २१, रा. बाळापूर, जि. अकोला), देवेंद्र अनिल बावस्कर (वय २३, रा. बाळापूर, जि. अकोला), प्रदुम्न दिनेश विरघट (वय १९, रा. अकोला), एक विधी संघर्षित बालक

जप्त मुद्देमाल..
४०,०००/- रुपये रोख रक्कम, ०३ गावठी पिस्तूल, ०५ मॅगझीन, १० जिवंत काडतुसे, ०९ मोबाईल फोन, निळ्या रंगाची सॅक बॅग विशेष म्हणजे, अटक आरोपींपैकी सचिन अरविंद भालेराव याच्यावर भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा प्रयत्न आणि दंगा करण्यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याला २०२३ मध्ये महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार दोन वर्षांसाठी जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड व त्यांच्या पथकाने पार पाडली आहे. पोउपनि. शरद बागल, सोपान गोरे, शेखर डोमाळे, जितेंद्र वल्टे, पोउपनि. रवी नरवाडे, पोहेकों गोपाळ गव्हाळे, प्रेमचंद सपकाळे, उमाकांत पाटील, सलीम तडवी, श्रीकृष्ण देशमुख, विकास सातदिवे, प्रितमकुमार पाटील, सुनिल दामोदरे, विनोद पाटील, यशवंत टहाकळे, लक्ष्मण पाटील, नितीन बाविस्कर, अक्रम शेख, प्रविण भालेराव, मुरलीधर धनगर, किशोर पाटील, ईश्वर पाटील, छगन तायडे, रतनहरी गिते, प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे, राहुल रगडे, सचिन घुगे, मयुर निकम, महेश पाटील, सागर पाटील, भुषण शेलार, सिध्देश्वर डापकर, प्रदीप सपकाळे, रविंद्र कापडणे, जितेंद्र पाटील, रविंद्र चौधरी, राहुल महाजन, दिपक चौधरी, दर्शन ढाकणे, बाबासाहेब पाटील, प्रमोद ठाकुर, भारत पाटील तसेच मिलींद जाधव, गौरव पाटील तसेच बाजारपेठ पोलीस स्टेशनचे विजय नेरकर, योगेश माळी, सचिन चौधरी, महेंद्र पाटील, अमर अढाळे, हर्षल महाजन, प्रशांत सोनार, भुषण चौधरी, प्रदीप चवरे यांनी केली आहे. पुढील तपास मुक्ताईनगर पोलीस स्टेशन करत आहे.


 

Tags: #jalgaon #maharashtraCrimePolice
Next Post
बिल पास करण्यासाठी अधिकाऱ्याने मागितली लाच ! एसीबीने रंगेहात पकडले; गुन्हा दाखल

बिल पास करण्यासाठी अधिकाऱ्याने मागितली लाच ! एसीबीने रंगेहात पकडले; गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रत्येक दात्याला हेल्मेटचे वाटप!
खान्देश

रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रत्येक दात्याला हेल्मेटचे वाटप!

December 2, 2025
यावल नगर परिषद निवडणूक: मतदानासाठी महिलांचा ‘विक्रमी’ उत्साह!
खान्देश

यावल नगर परिषद निवडणूक: मतदानासाठी महिलांचा ‘विक्रमी’ उत्साह!

December 2, 2025
अमूर्त शैलीतील ‘ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शन जळगावात!
खान्देश

अमूर्त शैलीतील ‘ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शन जळगावात!

December 2, 2025
वाळूमाफियांना रोखणाऱ्या तलाठ्याच्या कानशिलात लगावली, ‘टॉमी’ने हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न!
खान्देश

वाळूमाफियांना रोखणाऱ्या तलाठ्याच्या कानशिलात लगावली, ‘टॉमी’ने हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न!

December 2, 2025
शिवनेरी ग्रुपतर्फे रक्तदान शिबिर आणि कीर्तन सोहळ्याचे आयोजन
जळगाव जिल्हा

शिवनेरी ग्रुपतर्फे रक्तदान शिबिर आणि कीर्तन सोहळ्याचे आयोजन

December 1, 2025
कामगारांना मतदानासाठी ‘भरपगारी सुट्टी’ अनिवार्य: आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई होणार!
खान्देश

कामगारांना मतदानासाठी ‘भरपगारी सुट्टी’ अनिवार्य: आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई होणार!

December 1, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group