• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
October 14, 2025
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

जळगाव, (प्रतिनिधी) : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे सत्रासेन ते चोपडा रोडवर मोठी कारवाई करत गांजाची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना मोटारसायकलसह ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एकूण २२८६४० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाला सत्रासेन ते चोपडा रोडने दोन इसम मोटारसायकलवर गांजा या अंमली पदार्थाची वाहतूक करणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार तसेच चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक मधुकर साळवे आणि अंमलदार यांनी संयुक्तरीत्या सत्रासेन ते चोपडा रोडवर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली.

तपासणी दरम्यान, गांजाची अवैध वाहतूक करणाऱ्या मोटारसायकलवरील दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. अविनाश साहेबराव ढिवरे (वय-२६, रा. खोकरी, पो.स्ट. धवली, ता. वरला, जि. बडवाणी) आणि रोशन साहेबराव ढिवरे (वय-३१, रा. खोकरी, पो.स्ट. धवली, ता. वरला, जि. बडवाणी) अशी त्यांची नावे आहेत.

दरम्यान आरोपींकडून ८ किलो १२० ग्रॅम वजनाचा १७८६४० रुपये किंमतीचा गांजा, ४०००० रुपये किंमतीची एक मोटार सायकल आणि १०००० रुपये किंमतीचा एक मोबाईल फोन असा एकूण २२८६४० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या दोन्ही आरोपींविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव परिक्षेत्र कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप, चोपडा भाग, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, चोपडा शहर पो.स्टे. चार्ज मधुकर साळवे, चोपडा ग्रामीण पो.स्टे. यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.

स.पो.नि. शेषराव नितनवरे (नेम. चोपडा ग्रामीण पो.स्टे), पोउपनिरी. जितेंद्र वल्टे, पोहेकॉ. दिपक माळी, पोहेकॉ. रविंद्र पाटील, पोहेकॉ. विलेश सोनवणे, पोकॉ. रावसाहेब पाटील (सर्व नेमणुक स्था.गु.शा. जळगाव), तसेच चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोहेकॉ. राकेश पाटील, पोकॉ. मनेष गावीत, पोकॉ. प्रमोद पवार, पोकॉ. तिरुपती खांडेकर, पोकॉ. किरण पारधी यांनी कारवाईत सहभाग घेतला.

Tags: chopdaCrimePolice
Next Post
जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित

जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; 'राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा'ने सन्मानित

ताज्या बातम्या

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश
खान्देश

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

October 14, 2025
मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श
कृषी

मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श

October 14, 2025
जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित
खान्देश

जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित

October 14, 2025
अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
खान्देश

अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

October 14, 2025
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; वाळू डंपर सुरू ठेवण्यासाठी लाच स्वीकारताना ‘पंटर’ गजाआड
खान्देश

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; वाळू डंपर सुरू ठेवण्यासाठी लाच स्वीकारताना ‘पंटर’ गजाआड

October 14, 2025
पूरग्रस्त ५१ शेतकऱ्यांना भरारी, कृषीसम्राट फाउंडेशनतर्फे बियाणे, खते व फराळाचे वाटप
कृषी

पूरग्रस्त ५१ शेतकऱ्यांना भरारी, कृषीसम्राट फाउंडेशनतर्फे बियाणे, खते व फराळाचे वाटप

October 13, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group