• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बकरी चोरी करणारे ०३ आरोपी जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 11, 2025
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
बकरी चोरी करणारे ०३ आरोपी जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

जळगाव, (प्रतिनिधी) : स्थानिक गुन्हे शाखेने बकरी चोरी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश करत तीन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल आणि गुन्ह्यासाठी वापरलेल्या दोन मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, सैय्यद परवेज सैय्यद आसिफ यांनी ९ सप्टेंबर रोजी शनिपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. २७ ऑगस्ट रोजी त्यांचा ७,००० रुपये किमतीचा बोकड आणि आवेश शेख यांची ६,००० रुपये किमतीची बकरी चोरीला गेल्याचे त्यांनी सांगितले. या तक्रारीवरून शनिपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

या गुन्ह्याचा तपास करत असताना, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल आणि त्यांच्या पथकाने आरोपी गणेश वासुदेव जाधव (वय २०), गणेश अशोक पाटील (वय २१) आणि अक्षय विजय वंजारी (वय २३) यांना ताब्यात घेतले. हे सर्व आरोपी चिंचोली, जळगाव येथील रहिवासी आहेत.

पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी बकरी आणि बोकड चोरी केल्याची कबुली दिली. तसेच, त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतूनही तीन बकऱ्या चोरल्याचे सांगितले. आरोपींनी चोरीचा बोकड आणि बकरी राहुल रतन राऊळकर नावाच्या खाटिक व्यक्तीला विकल्याचे सांगितले. पोलिसांनी खाटिककडून बकरी जप्त केली असून, बोकडाची रोख रक्कम हस्तगत केली आहे.

आरोपींना पुढील तपासासाठी शनिपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यामध्ये पोउपनि. शरद बागल, सफौ. अतुल वंजारी, पोहेकों प्रवीण भालेराव, मुरलीधर धनगर, विजय पाटील, अक्रम शेख, नितीन बाविस्कर, पोना किशोर पाटील, पोकों रतनहरी गिते, सिद्धेश्वर डापकर, प्रदीप चवरे, रवींद्र कापडणे यांनी सहभाग घेतला.

Tags: Crime
Next Post
कासोदा पोलिसांची कारवाई; जुगार अड्ड्यावर छापा, ७ जुगारींना अटक

कासोदा पोलिसांची कारवाई; जुगार अड्ड्यावर छापा, ७ जुगारींना अटक

ताज्या बातम्या

कार्यस्थळी महिलांचा सन्मान अन् सुरक्षितता ही सामाजिक बांधिलकी : अ‍ॅड. डॉ. ललिता सपकाळे
जळगाव जिल्हा

कार्यस्थळी महिलांचा सन्मान अन् सुरक्षितता ही सामाजिक बांधिलकी : अ‍ॅड. डॉ. ललिता सपकाळे

July 22, 2026
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू
शैक्षणिक

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात कृषी शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

July 22, 2026
‘गाठोड्याचं गुपित’ बालनाट्याचा २८ वा प्रयोग उत्साहात; शिरसोलीतील ७०० विद्यार्थ्यांनी घेतला आस्वाद!
मनोरंजन

‘गाठोड्याचं गुपित’ बालनाट्याचा २८ वा प्रयोग उत्साहात; शिरसोलीतील ७०० विद्यार्थ्यांनी घेतला आस्वाद!

July 22, 2026
देवांग कोष्टी समाज जळगावच्या अध्यक्षपदी विजय खराडे; नवी कार्यकारिणी जाहीर
सामाजिक

देवांग कोष्टी समाज जळगावच्या अध्यक्षपदी विजय खराडे; नवी कार्यकारिणी जाहीर

July 21, 2026
मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कंदर येथे मेहरुणच्या ग्रामस्थांनी घेतले ह.भ.प. मंगेश महाराजांचे आशीर्वाद
जळगाव जिल्हा

मुक्ताबाई राम पालखी सोहळ्यात कंदर येथे मेहरुणच्या ग्रामस्थांनी घेतले ह.भ.प. मंगेश महाराजांचे आशीर्वाद

July 21, 2026
जळगावात १२ लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह कार जप्त, दोघे गजाआड
गुन्हे

जळगावात १२ लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह कार जप्त, दोघे गजाआड

July 20, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add