जळगाव, (प्रतिनिधी) : श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात इयत्ता ८ वी ते १०वी च्या विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकास, अभ्यासाच्या पद्धती आणि वेळेचे नियोजन या विषयांवर दिनेश देसाई यांनी मार्गदर्शन केले. यावेळी देसाई यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा, कोणत्या वेळी अभ्यास करणे फायदेशीर ठरते आणि वेळेचे योग्य नियोजन कसे करावे याबद्दल मोलाचे सल्ले दिले.
शैक्षणिक मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी तसेच शिक्षक आणि संस्थेसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सिद्ध होईल. यामुळे विशेषतः अभ्यासात मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठी मदत होईल, असे मत मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी देसाई यांचे आभार वृक्ष देऊन मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरला पाटील यांनी केले, तर उपशिक्षिका शितल कोळी आणि साधना शिरसाट कार्यक्रमाला उपस्थित होत्या.