• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महामार्गावर लुटमार करणाऱ्या सराईत गुन्हेगारासह एकाला अटक

भररस्त्यात वाहन थांबवून चालकाची केली होती लूट

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
August 21, 2025
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
महामार्गावर लुटमार करणाऱ्या सराईत गुन्हेगारासह एकाला अटक

यावल, (प्रतिनिधी) : रात्रीच्या वेळी महामार्गावर चालकांना अडवून लुटमार करणाऱ्या एका सराईत गुन्हेगारासह त्याच्या साथीदाराला यावल पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून लुटलेली ५ हजार रुपयांची रक्कमही हस्तगत करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १७ ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास रोहित प्रकाश रल (वय २४) हे त्यांच्या महिंद्रा पिकअप गाडीतून रावेर ते चोपडा महामार्गाने जात असताना, यावल शहरातील बुरुज चौकात दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांचे वाहन थांबवले. आरोपींनी त्यांना मारहाण करून त्यांच्या गाडीच्या डॅशबोर्डमधून ५ हजार रुपये रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे असलेली पिशवी जबरदस्तीने काढून घेतली. या घटनेनंतर रोहित रल यांनी यावल पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला होता.

या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांनी गुन्हा लवकर उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी गोपनीय माहिती आणि परिसरातील स्थानिक रहिवाशांच्या चौकशीच्या आधारे तपास सुरू केला.

या तपासात समशेर शहा सलीम शहा (वय २७, रा. बाहेरपुरा, यावल) आणि समीर रहेमान तडवी (वय २२, रा. तडवी कॉलनी, यावल) या दोघांनी हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपी समशेर शहा याला जळगाव येथील गेंदालाल मिलजवळून, तर समीरला यावलमधून ताब्यात घेऊन अटक केली.

पोलिसांनी या आरोपींकडून लुटलेली ५ हजार रुपयांची रक्कम जप्त केली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी समशेर शहा सलीम शहा हा एक सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी भुसावळ रेल्वे पोलीस स्टेशन आणि भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये चोरी, जबरी चोरी, घरफोडी आणि विनयभंगासह अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत अनेक गुन्हे दाखल आहेत.

सदरची यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या नेतृत्वाखाली स. फौ. विजय पाचपोळे, पोहेकॉ वासुदेव मराठे, पोहेकॉ निलेश चौधरी, पोना अमित तडवी, पोकॉ अर्षद गवळी, पोकॉ ऐजाज गवळी, पोकॉ अनिल साळुंखे आणि पोकॉ सागर कोळी यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे करीत आहेत.

Tags: Crime
Next Post
जैन हिल्स येथे पोळा उत्साहात साजरा; मान्यवरांनी धरला ठेका

जैन हिल्स येथे पोळा उत्साहात साजरा; मान्यवरांनी धरला ठेका

ताज्या बातम्या

बिल पास करण्यासाठी अधिकाऱ्याने मागितली लाच ! एसीबीने रंगेहात पकडले; गुन्हा दाखल
खान्देश

बिल पास करण्यासाठी अधिकाऱ्याने मागितली लाच ! एसीबीने रंगेहात पकडले; गुन्हा दाखल

October 16, 2025
स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई!.. पेट्रोल पंप दरोड्याचा पर्दाफाश; सहा आरोपी जेरबंद, मुद्देमाल जप्त
खान्देश

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई!.. पेट्रोल पंप दरोड्याचा पर्दाफाश; सहा आरोपी जेरबंद, मुद्देमाल जप्त

October 16, 2025
संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश
खान्देश

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

October 14, 2025
मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श
कृषी

मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श

October 14, 2025
जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित
खान्देश

जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित

October 14, 2025
अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
खान्देश

अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

October 14, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group