नशिराबाद, (प्रतिनिधी) : येथील राजमुद्रा ग्रुप गणेश मित्र मंडळाची यंदाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, मंडळाच्या ५व्या वर्षासाठी अध्यक्षपदी नितीन नांदुरकर यांची, तर सचिवपदी यश पाटील यांची निवड झाली आहे. यंदा गणेशोत्सव काळात मंडळात १० फूट उंचीची स्वामी समर्थांच्या रूपातील गणेश मूर्ती विराजमान केली जाणार आहे.
या वर्षी मंडळाने अध्यात्मिक आणि सामाजिक उपक्रमांवर भर दिला आहे. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत विशेष अतिथी म्हणून पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी, डीवायएसपी संदीप गावित यांच्यासह जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते महाआरतीचा कार्यक्रमही होणार आहे.
मंडळ परिसरात स्वामी समर्थांच्या जीवनपटावर आधारित विविध देखावे साकारले जाणार आहेत. त्यामुळे हा उत्सव गणेशभक्तांसाठी एक अनोखा आध्यात्मिक अनुभव देणारा ठरणार आहे.
मंडळाची कार्यकारिणी:
अध्यक्ष: नितीन नांदुरकर, उपाध्यक्ष: रितेश टापरे, सचिव: यश पाटील, सहसचिव: योगेश बाविस्कर, संकेत कावळे, किरण शिवरामे, मयूर शिवरामे, निखिल महाजन, तेजस यवकार, अक्षय घुमरे, धनराज भावसार, संतोष खारे, भरत राजपूत, यश भावसार यांच्यासह सदस्यांचा समावेश आहे.