• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा निर्घृण खून, पतीला अटक

पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील प्रकार

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
August 20, 2025
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा निर्घृण खून, पतीला अटक

पाचोरा, (प्रतिनिधी) : तालुक्यातील लोहारा येथे चारित्र्याच्या संशयावरून एका पतीने गाढ झोपेत असलेल्या आपल्या पत्नीचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री ११ ते १२ वाजेच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी पतीला अटक केली असून, पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितीन दौलत शिंदे (वय ३५, रा. पाचोरा रोड, लोहारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे, तर मयत पत्नीचे नाव अर्चना उर्फ कविता नितीन शिंदे (वय ३२) आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.

मयत अर्चनाचा भाऊ आकाश कडूबा सपकाळ यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, नितीन शिंदे आणि त्याच्या कुटुंबीयांकडून अर्चनाचा अनेक दिवसांपासून मानसिक आणि शारीरिक छळ सुरू होता. नितीन तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. तसेच, घर बांधण्यासाठी तिच्या माहेरच्या लोकांकडून १० लाख रुपये आणण्यासाठीही तिचा छळ केला जात होता. मंगळवारी मध्यरात्री अर्चना गाढ झोपेत असताना, नितीनने धारदार शस्त्राने तिच्यावर वार करून तिची हत्या केली.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक अरुण आव्हाड आणि स.पो.नि. कल्याणी वर्मा यांच्यासह पोलीस यंत्रणेने घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी नितीन शिंदेला ताब्यात घेतले. पुढील तपास पोलीस करत आहेत. जिल्ह्यात अशाप्रकारे सतत घडणाऱ्या खुनाच्या घटनांमुळे समाजमन सुन्न झाले आहे.

Tags: #pachoraCrimePolice
Next Post
जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त आर्थिक साक्षरता मार्गदर्शन

जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त आर्थिक साक्षरता मार्गदर्शन

ताज्या बातम्या

पोलिसांची मोठी कारवाई : १८ तलवारी जप्त, एक जण अटकेत
गुन्हे

पोलिसांची मोठी कारवाई : १८ तलवारी जप्त, एक जण अटकेत

September 19, 2025
जीएसटी दर कपात : सर्वसामान्यांच्या समृद्धीचा महामार्ग – भाजप
जळगाव जिल्हा

जीएसटी दर कपात : सर्वसामान्यांच्या समृद्धीचा महामार्ग – भाजप

September 19, 2025
‘इतिहास महाराष्ट्राचा’ महाअंतिम फेरीत जळगावच्या गुरुवर्य प.वि. प्राथमिक विद्यालयाचा डंका
जळगाव जिल्हा

‘इतिहास महाराष्ट्राचा’ महाअंतिम फेरीत जळगावच्या गुरुवर्य प.वि. प्राथमिक विद्यालयाचा डंका

September 18, 2025
अरुश्री आणि मुक्ती फाउंडेशनतर्फे महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर संपन्न
आरोग्य

अरुश्री आणि मुक्ती फाउंडेशनतर्फे महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर संपन्न

September 18, 2025
मुक्ताईनगर तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस, १५ गावांमध्ये पूर
जळगाव जिल्हा

मुक्ताईनगर तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस, १५ गावांमध्ये पूर

September 16, 2025
संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘ऑक्सिजन पार्क’ची निर्मिती; ओझोन दिनानिमित्त विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम
जळगाव जिल्हा

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘ऑक्सिजन पार्क’ची निर्मिती; ओझोन दिनानिमित्त विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम

September 16, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group