• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मुलींच्या गटात महाराष्ट्रातील क्रिशा जैनची आघाडी

राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेतून उद्याचे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू घडणार, डॉ.भावना जैन यांचा विश्वास

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
August 8, 2025
in क्रिडा, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र
0
मुलींच्या गटात महाराष्ट्रातील क्रिशा जैनची आघाडी

जळगाव, (प्रतिनिधी) : जैन हिल्सच्या अनुभूती मंडपम येथे सुरु असलेल्या ३८ व्या राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत जोरदार चुरस निर्माण झाली आहे. स्पर्धेत शुक्रवारी शेवटची फेरी खेळली जाणार असून विजेतेपदासाठी खेळाडूंमध्ये अटीतटीची लढत सुरु आहेत. मुलांमध्ये दिल्लीचा अरिहत कपिल याने आठ गुण घेत आघाडी घेतली आहे. त्याला ७.५ गुणांसह महाराष्ट्राचा आर्यन मेहता, मनी सरबातो (पश्चिम बंगाल), वोनिश्चिक मंडल (पश्चिम बंगाल) लढत देत आहेत. मुलींमध्ये महाराष्ट्राची क्रिशा जैन हिने आघाडी घेतली आहे. तिच्यासमोर वंशिका (दिल्ली) आणि जानकी (केरळ) यांनी आव्हान उभे केले आहे.

मुलांच्या लढती अशा रंगल्या..
जैन हिल्स येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत ३९२ मुले आणि १७७ मुली सहभागी झाल्या आहेत. त्यांच्यात पहिल्या दिवसांपासून जोरदार लढती सुरु आहेत. स्पर्धेतील नववी फेरी रंगतदार झाली. आघाडीवर असलेल्या खेळाडूंचे सामने अनिर्णित राहिले. पश्चिम बंगालमधील मनी सरबातो आणि अरहित कपिल यांचा सामना बरोबरीत सुटला. यामुळे कपिल याचे आठ गुण झाले तर मनी सरबातो ७.५ गुणांवर आहे. महाराष्ट्राचा अद्वित अग्रवाल आणि पश्चिम बंगालचा अवरित चव्हाण यांच्यातील नवव्या फेरीतील सामनाही बरोबरीत राहिला. कर्नाटकमधील अभिनव आनंद आणि महाराष्ट्रातील अविरत चौहान यांचा लढतीचाही निकाल लागला नाही. तो सामनाही बरोबरीत राहिला. परंतु महाराष्ट्राचा आर्यन मेहता याने तेलंगणातील नदोष शामल याचा पराभव करत स्पर्धेत चुरस कायम ठेवली. पॉडिचेरी येथील राहुल रामकृष्ण आणि गुजरातमधील विहान यांची लढतसुद्धा बरोबरीत राहिली. पश्चिम बंगालमधील वोनिश्चिक मंडल याने धुव्र गुप्ता याचा पराभव केला.

मुलींच्या गटात महाराष्ट्रातील क्रिशासमोर आव्हान..
मुलांप्रमाणे मुलींच्या गटात नवव्या फेरीअखेर चांगलीच चुरस आहे. महाराष्ट्रातील क्रिशा जैन हिने ८ गुण घेत विजेतेपदाकडे एक पाऊल पुढे टाकले आहे. क्रिशा हिने नवव्या फेरीत केरळमधील दिवी बिजेस हिला पराभूत केले. समीहा (तेलंगणा) आणि वंशिका रावल (दिल्ली) यांच्या लढतीत वंशिका विजयी झाली. तेलंगणातील अलाहिमा हिचा केरळमधील जानकी एस डी हिने अटीतटीच्या लढतीत पराभव केला. महाराष्ट्रातील क्रिशा ही ८ गुणांसह आघाडीवर आहे तर वंशिका आणि जानकी ७.५ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

कौशल्य दाखवण्याचे सर्वोत्कृष्ट व्यासपीठ.. -डॉ.भावना जैन..
गुरुवारी सकाळच्या सत्राचे उद्घाटन कांताई नेत्रालयाच्या प्रमुख डॉ.भावना जैन यांनी बुद्धिबळाच्या पटावरील चाल खेळत केले. यावेळी खेळाडूंसोबत संवाद साधताना त्यांनी सांगितले की, देशभरातून आलेले सर्व खेळाडू जैन हिल्स येथे सुरु असलेल्या बुद्धिबळ स्पर्धेचा आनंद घेत आहेत. तुमच्यातील काही जण उद्याचे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू होणार आहेत. देशातील नामांकीत बुद्धिबळपटू तयार होणार आहे. त्यासाठी तुमच्यात असलेले कौशल्य दाखवण्याचे हे सर्वोत्कृष्ट व्यासपीठ तुम्हाला मिळाले आहे. त्याचा पुरेपुर लाभ घ्या, असे आवाहन डॉ.भावना जैन यांनी केले. उद्घाटन प्रसंगी जळगाव बुद्धिबळ संघटनेचे सचिव नंदलाल गादिया, मुख्य पंच देवाशीष बरुआ उपस्थित होते. स्पर्धेसाठी अरविंद देशापांडे, प्रविण ठाकरे, रवींद्र धर्माधिकारी, संजय पाटील परिश्रम घेत आहेत.

 


 

Next Post
घरफोडी करणारा अट्टल चोरटा अखेर पोलिसांच्या जाळ्यात, २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

घरफोडी करणारा अट्टल चोरटा अखेर पोलिसांच्या जाळ्यात, २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्या

विज्ञानाचा अविष्कार: महाविद्यालयात रंगले ‘इस्रो’च्या उपग्रहांचे पोस्टर प्रदर्शन!
जळगाव जिल्हा

विज्ञानाचा अविष्कार: महाविद्यालयात रंगले ‘इस्रो’च्या उपग्रहांचे पोस्टर प्रदर्शन!

January 30, 2026
जळगाव जिल्ह्यात १० वी, १२ वीच्या परीक्षेवर ‘ड्रोन’ची नजर; कॉपीबहाद्दरांवर थेट फौजदारी कारवाई!
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात १० वी, १२ वीच्या परीक्षेवर ‘ड्रोन’ची नजर; कॉपीबहाद्दरांवर थेट फौजदारी कारवाई!

January 30, 2026
रामराज्याच्या संकल्पनेसाठी जळगावमध्ये १ फेब्रुवारीला ‘हिंदु राष्ट्र जागृती सभा’!
खान्देश

रामराज्याच्या संकल्पनेसाठी जळगावमध्ये १ फेब्रुवारीला ‘हिंदु राष्ट्र जागृती सभा’!

January 29, 2026
नाईट फुटबॉल स्पर्धेत जैन इरिगेशनचे निर्भेळ यश; अंतिम सामन्यात जालन्याचा पराभव
क्रिडा

नाईट फुटबॉल स्पर्धेत जैन इरिगेशनचे निर्भेळ यश; अंतिम सामन्यात जालन्याचा पराभव

January 28, 2026
पावसाच्या व्यत्ययानंतरही जळगावकरांची ‘खाऊ गल्ली’वर गर्दी; बहिणाबाई महोत्सवाचा असा झाला समारोप!
जळगाव जिल्हा

पावसाच्या व्यत्ययानंतरही जळगावकरांची ‘खाऊ गल्ली’वर गर्दी; बहिणाबाई महोत्सवाचा असा झाला समारोप!

January 27, 2026
जळगावच्या महापौर-उपमहापौर निवडीचा मुहूर्त ठरला; ६ फेब्रुवारीला रंगणार रणधुमाळी!
जळगाव जिल्हा

जळगावच्या महापौर-उपमहापौर निवडीचा मुहूर्त ठरला; ६ फेब्रुवारीला रंगणार रणधुमाळी!

January 27, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group