जळगाव, दि. 16 – जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या धुळे येथील पथकाने गुरूवारी जळगावातील कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि महानगरपालिका इमारत परिसरात आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक करून दाखवले.
अग्निशमन व बचावाची रंगीत तालीम तसेच आग, पूर परिस्थिती, भूकंप अशा संकटाच्या वेळेत या पथकाची कसोटी लागत असते. दरम्यान पथकाच्या ५ दिवसीय कार्यशाळेचा समारोप आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक दाखवत करण्यात आला.