• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

फुटबॉल सुपर कॉर्पोरेट लीगमध्ये जैन इरिगेशन चॅम्पियन्स

स्पर्धेत बेस्ट मिड फिल्डर अभंग जैन तर बेस्ट स्कोरर आकाश कांबळे

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
July 28, 2025
in क्रिडा, जळगाव जिल्हा
0
फुटबॉल सुपर कॉर्पोरेट लीगमध्ये जैन इरिगेशन चॅम्पियन्स

जळगाव, (प्रतिनिधी) : मुंबई फुटबॉल असोसिएशन आयोजित सुपर कॉर्पोरेट लीग स्पर्धेत जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीच्या फुटबॉल संघ अंतिम विजेता ठरला आहे. पहिल्यांदा सहभागी झालेल्या जैन इरिगेशनच्या संघाने संपूर्ण स्पर्धेत विक्रमी ३० गोल केलीत. या विजयामुळे प्रतिष्ठित असलेल्या ‘एलिट लिग’ स्पर्धेसाठी संघ पात्र ठरला आहे. बेस्ट मिड फिल्डर म्हणून अभंग अजित जैन, बेस्ट स्कोरर म्हणून आकाश कांबळे यांना सन्मानित करण्यात आले.

मुंबई फुटबॉल असोसिएशन आयोजित सुपर कॉर्पोरेट लीगचा अंतिम सामना बांद्रा नॅव्हील डिसूजा ग्राऊंडवर झाला. संपूर्ण स्पर्धेत कॉर्पोरेट जगतातील १६ संघांनी सहभाग घेतला. ‘ए’ व ‘बी’ गृप मध्ये ही स्पर्धा होत आहे. यात जळगावच्या जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीचा फुटबॉल संघ पहिल्यांदा सहभागी झाला होता. लीग पद्धतीने खेळविण्यात आलेल्या या स्पर्धेत पहिल्या सामन्यापासून आघाडी घेतली. स्टेट बँक ऑफ इंडिया, नेव्हल डॉकयार्ड, सॅब केमिकल, एचडीएफसी, सेंट्रल रेल्वे, टेली परफॉर्मन्स, जी. एम. पोलीस या मातब्बर संघाविरूद्ध ३० गोल जैन इरिगेशनच्या खेळाडूंनी मारले.

प्ले ऑफ च्या लढतीत जैन इरिगेशनने सेंट्रल रेल्वेचा २-१ ने पराभव केला. दुसऱ्या प्ले ऑफ च्या लढतीत टेली परफॉर्मन्स ला २-० ने नमवून अंतिम सामन्यात जी. एम. पोलीस यांच्याशी जैन इरिगेशन भिडले. कौशिक पांचाळ याने पहिला गोल २ मिनिटात, दुसरा गोल ३ मिनिटात केला. तर पहिल्या हाफ मध्येच तिसरा गोल फवाझ अहमद यांनी केला. लागलीच १८ व्या मिनिटाला चौथा गोल अभंग जैन यांनी करून जी. एम. पोलीस यांना चक्रावून सोडले. त्यात कौशल पांचाळ याने शेवटचा गोल मारून हॅट्रीक साधली. जी. एम. पोलीस संघावर ५-१ ने एकतर्फी विजयी जैन इरिगेशनने मिळविला.

पहिल्या सामन्यापासून प्रथम स्थानावर राहिल्याने विजयी ठरला. आक्रमक शैलीतून खेळलेल्या जैन इरिगेशनच्या फुटबॉलपटूंनी स्पर्धेत आपली छाप सोडली. झालेल्या आठ सामन्यांमध्ये जैन इरिगेशनकडून आकाश कांबळे ७ गोल, कौशिक पांचाळ ७ गोल, अभंग जैन ५ गोल, फवाज अहमद ३ गोल, मोईझ अकमल २ गोल, यश सहानी ३ गोल, अरशद शेख २ गोल, रोहित फतियाल १ गोल असे एकूण ३० गोल केलेत. मुख्य संघ प्रशिक्षक म्हणून अब्दुल मोहसिन काम पाहिले. या यशाबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जैन स्पोर्टस अॅकॅडमीचे अतुल जैन यांच्यासह अरविंद देशपांडे, रविंद्र धर्माधिकारी व सहकाऱ्यांनी कौतूक केले.

 


Tags: #sports
Next Post
जळगावात ‘श्रावण सरी’ कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगावात 'श्रावण सरी' कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ताज्या बातम्या

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश
खान्देश

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

October 14, 2025
मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श
कृषी

मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श

October 14, 2025
जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित
खान्देश

जैन इरिगेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा; ‘राज्य निर्यात सुवर्ण पुरस्कारा’ने सन्मानित

October 14, 2025
अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
खान्देश

अवैध गांजा वाहतुक करणारे दोन तस्कर जेरबंद!; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

October 14, 2025
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; वाळू डंपर सुरू ठेवण्यासाठी लाच स्वीकारताना ‘पंटर’ गजाआड
खान्देश

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई; वाळू डंपर सुरू ठेवण्यासाठी लाच स्वीकारताना ‘पंटर’ गजाआड

October 14, 2025
पूरग्रस्त ५१ शेतकऱ्यांना भरारी, कृषीसम्राट फाउंडेशनतर्फे बियाणे, खते व फराळाचे वाटप
कृषी

पूरग्रस्त ५१ शेतकऱ्यांना भरारी, कृषीसम्राट फाउंडेशनतर्फे बियाणे, खते व फराळाचे वाटप

October 13, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group