जळगाव, (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील कार्यक्षेत्रात कार्यरत असलेल्या खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, जळगावची ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि. २७ जुलै रोजी जळगाव येथे नाशिक विभाग पदवीधर आमदार सत्यजित दादा तांबे यांच्या उपस्थितीत संस्थेचे अध्यक्ष संतोष मराठे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
या सभेमध्ये संस्थेचे अध्यक्ष संतोष मराठे यांनी प्रास्ताविकात महत्त्वपूर्ण घोषणा केली. भविष्यात सर्व सभासदांसाठी सर्वसमावेशक विमा योजना काढण्यात येणार असून, दुर्दैवाने एखाद्या सभासदाचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना पतसंस्थेकडून घेतलेले कर्ज परतफेड करण्याची आवश्यकता राहणार नाही. या अंतर्गत १००% संपूर्ण कर्जमाफी योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले, ज्यामुळे सभासदांना मोठा दिलासा मिळणार आहे.
यावेळी व्यासपीठावर महासंघाचे राज्य सहसचिव अशोक मदाने, राज्य कार्यकारिणी सदस्य टी. के. पाटील, राज्य मुख्याध्यापक प्रमुख हेमंत पाटील, जिल्हाध्यक्ष अजित चौधरी, जिल्हा सचिव जीवन महाजन उपस्थित होते. तसेच पतसंस्थेचे अध्यक्ष संतोष मराठे, उपाध्यक्ष वना महाजन, ज्येष्ठ संचालक प्रसन्ना बोरोले, सलीम तडवी, प्रशांत साखरे, गोविंदा लोखंडे, आशिष पवार, स्वप्नील पाटील, सुनील पवार, गणेश लोडते, राकेश पाटील, प्रफुल्ल सरोदे, अविनाश घुगे, अमित चौधरी, धनंजय काकडे, रुपाली पाटील, स्वाती फिरके आणि तज्ञ संचालक सचिन चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवानिवृत्त कर्मचारी सत्कार समारंभाचे गणेश लोडते यांनी केले, तर सर्वसाधारण सभेचे कामकाज पतसंस्थेचे प्रभारी सचिव सचिन पाटील यांनी पाहिले. ही सभा अत्यंत उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.