जळगाव, (प्रतिनिधी) : समस्त लाडवंजारी समाज श्रीराम मंदिर संस्था, मेहरूण आणि जळगाव जिल्हा वंजारी युवा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच दहावी, बारावी आणि विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या १५० गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात उ. म. वी. सिनेट सदस्य वैशाली मनोज वराडे यांना सन २०२५ च्या ‘समाजभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून ईश्वर पढार, तर अध्यक्षस्थानी नशिराबाद नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे उपस्थित होते. बोदवडचे नगराध्यक्ष आनंदा पाटील, शहर मनपा उपायुक्त गणेश चाटे, विष्णू चकोर, जामनेरचे कृषी अधिकारी राजेशकुमार ढाकणे, डॉ. गजानन परखड, शोभाबाई मिलिंद लाड (सरपंच, चिंचोली), विठ्ठल आंधळे (एरंडोल), रमेश वंजारी (माजी अध्यक्ष), विलास सोनवणे (माजी सरपंच, पाटणादेवी), आत्माराम वंजारी आदी मान्यवर उपस्थित होते. सेवानिवृत्त रामचंद्र पुलिक वंजारी (वाहन चालक, महावितरण) आणि सेवानिवृत्त पी.एस.आय. सुनंदा मधुकर नाईक यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
प्रस्तावनेतून संघटनेच्या कामाचा आढावा घेत अध्यक्ष प्रशांत नाईक यांनी कार्यक्रमाविषयी माहिती दिली. यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष, रवींद्र सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांनी अपयशाने खचू नये, प्रयत्न कायम ठेवावेत. या भावनेने बांधिलकी जोपासली पाहिजे.” विद्यार्थिनी कुमारी पायल वराडे हिने समाज बांधवांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपाली आव्हाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रशांत नाईक यांनी केले. या कार्यक्रमाला किशोर पाटील (जामनेर), वैभव वंजारी (अंतुर्ली), कैलास वंजारी (मुक्ताईनगर), उमेश आव्हाड (पाटणादेवी), देवानंद वंजारी, वैभव वंजारी, कैलास पालवे, सुरेश सांगळे (एरंडोल), राजू काळे यांच्यासह जिल्ह्यातील लाडवंजारी समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वंजारी समाज व संघटनेचे अध्यक्ष प्रशांत नाईक, उपाध्यक्ष नामदेव वंजारी, सचिव महादू सोनवणे, उमेश आंधळे, संतोष घुगे, भानुदास नाईक, प्रविण सानप, नंदू वंजारी, समाधान चाटे, सचिन ढाकणे, रामेश्वर पाटील, संतोष चाटे यांनी विशेष सहकार्य केले.