जळगाव, (प्रतिनिधी) : महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. घोलप यांच्यावरील वाढत्या तक्रारी आणि गैरवर्तणूक प्रकरणी कारवाई होत नसल्याने आज सर्वपक्षीय शिष्टमंडळाने आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या दालनात तीव्र ठिय्या आंदोलन केले. डॉ. घोलप यांना तातडीने सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी यावेळी एकमुखाने करण्यात आली. त्यांच्या विरोधात चौकशी अहवाल सादर होऊनही कारवाई न झाल्याने शिष्टमंडळाने तीव्र संताप व्यक्त केला.
या आंदोलनात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि आरपीआय (आठवले गट) या पक्षांचे प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले होते. डॉ. घोलप यांच्यावर कारवाई न झाल्यास यापुढे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
यावेळी शिवसेना (उबाठा) चे कुलभूषण पाटील, काँग्रेसचे शाम तायडे, माजी नगरसेवक प्रशांत नाईक, आरपीआय आठवले गटाचे अनिल अडकमोल, युवासेनेचे पीयुष गांधी, महिला आघाडी मनीषा पाटील, प्रशांत सुरळकर, प्रमोद घुगे, योगेश चौधरी, विजय राठोड, किरण भावसार, जितू बारी, सचिन चौधरी, योगेश पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.