• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आठ किलो गांजासह दोन आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
July 22, 2025
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
आठ किलो गांजासह दोन आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

जळगाव, (प्रतिनिधी) : जिल्ह्यात अंमली पदार्थांची तस्करी आणि वाढत्या सेवनावर आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. ८ किलो १३० ग्रॅम गांजा आणि इतर मुद्देमालासह दोन आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. या कारवाईमुळे अंमली पदार्थ तस्करांना मोठा धक्का बसला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोहवा रवींद्र अभिमन पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की, दोन व्यक्ती काळ्या रंगाच्या बजाज पल्सर मोटरसायकलवरून (एम. एच.१८-बी. डब्ल्यू ८०३५) गलंगी गावाकडून चोपडा शहराकडे बेकायदेशीरपणे गांजाची वाहतूक करत आहेत. या माहितीच्या आधारे पोहवा विष्णू बिऱ्हाडे, रवींद्र पाटील आणि दीपक माळी यांनी गलंगी गावात पाळत ठेवली. आरोपींना पोलिसांची चाहूल लागताच त्यांनी चोपडा शहराकडे भरधाव वेगाने दुचाकी दामटली.

पाठलाग करणाऱ्या पोलीस पथकाने ही माहिती पोउपनिरी जितेंद्र वल्टे यांना दिली. पोउपनिरी जितेंद्र वल्टे यांनी विलेश सोनवणे आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने चोपडा शहरात नाकाबंदी केली. आरोपींना पकडण्याचा प्रयत्न करत असताना मोटरसायकलवर मागे बसलेला एक व्यक्ती उडी मारून पळून गेला. पोउपनिरी जितेंद्र वल्टे यांनी सुमारे १५० ते २०० मीटर धावत पाठलाग करून त्याला शिताफीने ताब्यात घेतले. उदयभान संजय पाटील (वय २१ रा.चांग्या), योगेश रामचंद्र महाजन (वय २१ वर्ष) दोन्ही रा. अडावद ता. चोपडा यांना अटक करण्यात आली आहे.

या कारवाईत ९०,०००/- रुपये किमतीची एक बजाज पल्सर मोटरसायकल, १,२१,९५०/- रुपये किमतीचा ८.१३० किलोग्रॅम वजनाचा गांजा आणि ५१,०००/- रुपये किमतीचे दोन मोबाईल असा एकूण २,६२,९५०/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास चोपडा शहर पोलीस स्टेशन करत आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील (स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव), पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, सहायक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे (चोपडा शहर पोलीस स्टेशन), पोउपनिरी जितेंद्र वल्टे, पोहवा विष्णू बिऱ्हाडे, रवी पाटील, दीपक माळी, विलेश सोनवणे, चालक दीपक चौधरी (सर्व स्थानिक गुन्हे शाखा जळगाव) तसेच पोकों मदन पावरा, महेंद्र पाटील, अतुल मोरे (चोपडा शहर पोलीस स्टेशन) यांच्या पथकाने केली.


Tags: Crime
Next Post
वंजारी समाजाकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा; अर्ज करण्याची अंतिम मुदत जवळ!

वंजारी समाजाकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा; अर्ज करण्याची अंतिम मुदत जवळ!

ताज्या बातम्या

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशन जळगाव परिमंडळाची नवीन कार्यकारिणी जाहीर
जळगाव जिल्हा

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशन जळगाव परिमंडळाची नवीन कार्यकारिणी जाहीर

July 25, 2025
गांधी विचारात आनंदी जीवनाची ताकद : गिरीश कुळकर्णी
जळगाव जिल्हा

गांधी विचारात आनंदी जीवनाची ताकद : गिरीश कुळकर्णी

July 25, 2025
जळगावात कुंटणखान्यावर धाड: बांगलादेशी तरुणीची सुटका, मुख्य सूत्रधार महिलेला अटक
खान्देश

जळगावात कुंटणखान्यावर धाड: बांगलादेशी तरुणीची सुटका, मुख्य सूत्रधार महिलेला अटक

July 24, 2025
डॉ. घोलप यांच्या बडतर्फीसाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे मनपा आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन!
जळगाव जिल्हा

डॉ. घोलप यांच्या बडतर्फीसाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे मनपा आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन!

July 24, 2025
चोपडा ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई: ४ गावठी कट्टे, ८ काडतुसांसह २ आरोपी गजाआड!
खान्देश

चोपडा ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई: ४ गावठी कट्टे, ८ काडतुसांसह २ आरोपी गजाआड!

July 24, 2025
महिला अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; ५ हजाराची लाच घेताना रंगेहाथ अटक
गुन्हे

महिला अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; ५ हजाराची लाच घेताना रंगेहाथ अटक

July 24, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group