• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला खिंडार: भडगावात माळी समाजाच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
July 20, 2025
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला खिंडार: भडगावात माळी समाजाच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

विजय बाविस्कर | भडगाव, (प्रतिनिधी) : येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि माळी समाजाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना शहर आणि ग्रामीण दोन्ही भागात अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे.

ग्रामीण आणि शहरी भागातील माळी समाज तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस किसान सेलचे अध्यक्ष दीपक संभाजी महाजन, संचालक रमेश महाजन, महात्मा फुले सेवाभावी मंडळाचे सचिव विनोद महाजन, माळी पंच मंडळाचे अध्यक्ष मुकुंदा महाजन, सावित्रीबाई फुले पतसंस्थेचे अध्यक्ष मनोज महाजन, आणि शिंदीचे माजी सरपंच दीपक महाजन यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत नावर्याचे प्रकाश महाजन, विजय महाजन, नंदु महाजन, रामचंद्र परदेशी, संदीप परदेशी, राकेश महाजन यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.

या पक्षप्रवेश सोहळ्याला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, समन्वय समितीचे अध्यक्ष युवराज पाटील, शिवसेनेचे जिल्हा उपसंघटक संजय पाटील, तालुकाप्रमुख सुधाकर पाटील, जिल्हा समन्वयक डॉ. प्रमोद पाटील, शहरप्रमुख आबा चौधरी, विजयकुमार भोसले, माजी नगरसेवक जगन भोई, उप तालुकाप्रमुख संजय वेलजी पाटील, गणप्रमुख सोनू महाजन, आबा महाजन, अनिल बिराडी आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला भडगाव तालुक्यात मोठा धक्का बसला असून, शिवसेनेला नव्याने बळ मिळाल्याचे चित्र आहे.

Tags: #pachora#politicalShivsena
Next Post
धक्कादायक! जळगावात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपीला अटक

धक्कादायक! जळगावात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपीला अटक

ताज्या बातम्या

पोलिसांची मोठी कारवाई : १८ तलवारी जप्त, एक जण अटकेत
गुन्हे

पोलिसांची मोठी कारवाई : १८ तलवारी जप्त, एक जण अटकेत

September 19, 2025
जीएसटी दर कपात : सर्वसामान्यांच्या समृद्धीचा महामार्ग – भाजप
जळगाव जिल्हा

जीएसटी दर कपात : सर्वसामान्यांच्या समृद्धीचा महामार्ग – भाजप

September 19, 2025
‘इतिहास महाराष्ट्राचा’ महाअंतिम फेरीत जळगावच्या गुरुवर्य प.वि. प्राथमिक विद्यालयाचा डंका
जळगाव जिल्हा

‘इतिहास महाराष्ट्राचा’ महाअंतिम फेरीत जळगावच्या गुरुवर्य प.वि. प्राथमिक विद्यालयाचा डंका

September 18, 2025
अरुश्री आणि मुक्ती फाउंडेशनतर्फे महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर संपन्न
आरोग्य

अरुश्री आणि मुक्ती फाउंडेशनतर्फे महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर संपन्न

September 18, 2025
मुक्ताईनगर तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस, १५ गावांमध्ये पूर
जळगाव जिल्हा

मुक्ताईनगर तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस, १५ गावांमध्ये पूर

September 16, 2025
संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘ऑक्सिजन पार्क’ची निर्मिती; ओझोन दिनानिमित्त विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम
जळगाव जिल्हा

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘ऑक्सिजन पार्क’ची निर्मिती; ओझोन दिनानिमित्त विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम

September 16, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group