• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

भडगाव येथे दरोड्याचे प्रकरण उघड, ४ आरोपी जेरबंद, ₹३७,००० चा मुद्देमाल हस्तगत

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 16, 2025
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
भडगाव येथे दरोड्याचे प्रकरण उघड, ४ आरोपी जेरबंद, ₹३७,००० चा मुद्देमाल हस्तगत

जळगाव, (प्रतिनिधी) : कजगाव गावाजवळ गोंडगाव रोडवर झालेल्या जबरी चोरी प्रकरणी भडगाव पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून ₹३७,००० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

फायनान्स कंपनीत फील्ड असिस्टंट मॅनेजर विक्की विठोबा पाटील (वय २४, रा. भालगाव बु.), हे पथराड येथून गोंडगाव मार्गे चाळीसगाव येथील कार्यालयात जात असताना दोन अज्ञात आरोपींनी त्याला अडवून मारहाण केली. आरोपींनी त्याची मोटारसायकल लाथा मारून पाडली आणि त्याच्याकडील ₹५८,४०० रोख रक्कम, ₹५,००० किमतीचा सॅमसंग टॅब आणि ₹२,००० किमतीचे बायोमेट्रिक मशीन असा एकूण ₹६५,४०० किमतीचा मुद्देमाल जबरदस्तीने हिसकावून घेतला होता. याप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तक्रारदाराच्या टॅबच्या शेवटच्या लोकेशनच्या माहितीनुसार बांबरुड प्र.ब. ता. भडगाव परिसरात तपास केला असता, पथराड गावातील काही तरुणांनी हा गुन्हा केल्याची माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी गोपाल संजय पारधी (वय ३२, रा. पथराड) याला १२ जुलै रोजी ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता त्याने इतर साथीदारांसोबत गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर, १३ जुलै रोजी मयुर ज्ञानेश्वर साळुंखे (वय २२, रा. पथराड) याला अटक करण्यात आली. १४ जुलै रोजी अतुल नाना पाटील (वय २६, रा. पथराड) आणि कैलास वाल्मिक पाटील (वय २७, रा. पथराड) या फरार आरोपींनाही ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींकडून चोरी गेलेल्या मुद्देमालापैकी ₹३७,००० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यात आणखी आरोपी असण्याची शक्यता असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

Next Post
जळगावात ‘इकोटुरिझम’ला भरारी: निसर्ग संवर्धन व स्थानिकांना रोजगार मिळणार

जळगावात ‘इकोटुरिझम’ला भरारी: निसर्ग संवर्धन व स्थानिकांना रोजगार मिळणार

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’चा मान!
खान्देश

जैन इरिगेशनला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’चा मान!

October 9, 2026
६५.७० कोटींचे अंमली पदार्थ नष्ट; जळगाव पोलिसांचे अवैध अंमली पदार्थविरोधी मोहिमेत मोठे यश
खान्देश

६५.७० कोटींचे अंमली पदार्थ नष्ट; जळगाव पोलिसांचे अवैध अंमली पदार्थविरोधी मोहिमेत मोठे यश

October 9, 2026
वरणगावात प्लास्टिकविरोधी धडक मोहीम; २५ किलो प्लास्टिक जप्त, ३५ हजारांचा दंड वसूल
खान्देश

वरणगावात प्लास्टिकविरोधी धडक मोहीम; २५ किलो प्लास्टिक जप्त, ३५ हजारांचा दंड वसूल

October 9, 2026
डॉ. वर्षा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
खान्देश

डॉ. वर्षा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

October 9, 2026
प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार
जळगाव जिल्हा

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
चिल्लरवर चोरट्यांचा डल्ला; किराणा दुकानातून १.७५ लाखांची रोकड लंपास
गुन्हे

चिल्लरवर चोरट्यांचा डल्ला; किराणा दुकानातून १.७५ लाखांची रोकड लंपास

October 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add