जळगाव,(प्रतिनिधी) : मेहरूणमधील प्रभाग क्रमांक १५ मध्ये आमदार राजू मामा भोळे यांच्या पुढाकाराने आणि नगरसेवक प्रशांत नाईक यांच्या प्रयत्नांतून दोन कोटी रुपये मंजूर झालेल्या रस्त्याच्या कामाचे नुकतेच भूमिपूजन झाले. आमदार राजू मामा भोळे यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने स्थानिक ग्रामस्थ, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या महत्त्वाच्या क्षणी प्रभागाचे माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी आमदार राजू मामा भोळे यांच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले, “आमदार राजू मामा यांचे कार्य समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचत आहे. गावाच्या विकासासाठी आणि गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांनी दाखवलेला तत्पर प्रतिसाद वाखाणण्याजोगा आहे.” या भूमिपूजनामुळे मेहरूणच्या विकासाला नवी दिशा मिळाली असून, हे एक मोठे पाऊल असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी कल्लू खाटीक, अल्ताफ शेख, वसीम खान, वसीम बेपारी, नदीम दादा, अनिश शेख, कल्लू पैलवान, सुतार भाई, अखिल खान, पेंटर, इक्बाल पिरजादे, नारायण महाजन, महारू सांगळे, राजेंद्र पाटील, ईश्वर सोनवणे, सलमान खाटीक, अफसर खाटीक, मगबुल तडवी, मुस्तफा मिर्झा, सचिन नाईक, रामेश्वर पाटील, खण्णा महाराज, फिरोज खान, वसीम बापू, लुकमान शेख, इम्रान बागवान, इरफान बागवान बल्ली, मुकेश घुगे, संजय पाटील, हेमंत नाईक, बंडू वाणी, सुनील सरोदे, विजय वानखेडे, प्रदीप रोटे, भूषण लाडवंजारी, ईश्वर पाटील, राकेश लाड, भैय्या वाघ, राजू पाटील, एकनाथ वाघ, मिलिंद आंधळे, प्रतीक नाईक, आबा ढाकणे, देवेंद्र नाईक, योगेश नाईक, राजेद्र सोनवणे, वासुदेव सानप, विनायक महाजन, सुनिल नाईक, इम्रान बागवान, महमूद रंगरेज, सलीम रंगरेज, आयाज मोसिन आणि इतर अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.