जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील पोस्टल कॉलनी परिसरातील श्री हरी मंदिर प्रतिष्ठानच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त रविवारी दि. ६ जुलै रोजी श्री हरी मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला परिसरातील भाविकांनी उत्स्फूर्तपणे आणि मोठ्या संख्येने हजेरी लावत आषाढी एकादशीचा आनंद लुटला.
कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल-रुक्मिणीच्या आरतीने झाली. आरतीनंतर ह.भ.प. गौ प्रेमी गजानन महाराज वरसाडेकर यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. महाराजांच्या कीर्तनाने संपूर्ण परिसरातील वातावरण विठ्ठलमय झाले आणि उपस्थितांनी भक्तीरसात तल्लीन होऊन या प्रवचनाचा लाभ घेतला. प्रवचन झाल्यानंतर भाविकांना फराळ वाटप करण्यात आले. यामध्ये साबुदाणा खिचडी, केळी, चिक्की आणि लाडू यांचा समावेश होता. भाविकांनी मोठ्या उत्साहात फराळाचा आस्वाद घेतला.
या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन आणि तो निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी कैलास भोळे, माजी नगरसेविका गायत्री राणे, उज्वला बेंडाळे, प्रतिभा वारके, विलास चौधरी, प्रशांत भंगाळे, डॉ. गजानन पाटील, योगेश सूर्यवंशी, महेश खडके, दीपक किरंगे, बी. एस. पाटील, गिरीश भोळे, हितेश जावळे, सचिन महाजन, शैलेंद्र पाटील, मुकेश महाजन, कुशल महाजन, शेखर चौधरी, पंकज पाटील, जितेंद्र भोळे, मयूर भोळे, पवन शिरसाळे, मयूर भोळे, आशुतोष मनिवाल, भूषण पाटील, दीपक पाटील, विनोद महाजन, रितेश पाटील, नंदिनी गिरीश भोळे, रेखा रवींद्र जावळे, उषा बेहरे, भूमी वारके, सेजल वारके, ज्योती पंकज पाटील, पल्लवी कपिल पाटील आदींनी महत्त्वाची भूमिका बजावली.